लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लद्दाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी दावा केला की, लेह लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित होईल. या परिसरात राष्ट्रवादाची भावना आहे. येथील लोक देशासाठी बलिदान देण्यास तयार आहे. ते म्हणाले सरकारने कलम ३७० काढल्यानंतर लद्दाखने विकासाची गती पकडली आहे. शिक्षण, ऊर्जा व रेल्वे सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे.जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित ‘लद्दाख काल आणि आज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यात नामग्याल बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीधरराव गाडगे उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार कृष्णा खोपडे, अनिल सोले, मोहन मते, जम्मू कश्मीर अध्ययन केंद्राच्या मीरा खडक्कार, जिव्हाळा फाऊंडेशनचे आशिष वांदिले व मनीष मेश्राम उपस्थित होते. नामग्याल म्हणाले सरकारचा कलम ३७० हटविण्याचा निर्णय धाडसी होता. एकेकाळी लेह-लद्दाख येथील लोकांचे कुणीच कैवारी नव्हते. या भागाला पडिक जमिनीचे क्षेत्र म्हटले जात होते. जम्मू काश्मिरातील लोक लढून-झगडून आपल्या मागण्या पूर्ण करीत होते. परंतु लेह-लद्दाखमध्ये असे होत नव्हते. येथे डिग्री कॉलेज देखील नव्हते. नोकऱ्या मिळत नव्हत्या. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अन्य राज्यात जावे लागत होते. कलम ३७० काढल्यानंतर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठ सुरू होत आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कॉलेज सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. जनता खूश आहे.दरम्यान श्रीधरराव गाडगे म्हणाले की, नागरिकता संशोधन कायद्यात नवीन काहीच नाही. केवळ हिंदू शब्दाला परिभाषित केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर देशाचा विरोध केला जात आहे. यासाठी सजग राहण्याची गरज आहे.सौर ऊर्जेला भरपूर संधीनामग्याल म्हणाले लद्दाखमध्ये सौर ऊर्जेचे उत्पादन करण्यासाठी भरपूर संधी आहे. लद्दाख पूर्ण जगाला वीज पुरवठा करण्याची क्षमता ठेवतो. त्याचप्रकारे पर्यटन क्षेत्राचाही येथे विकास होऊ शकतो. आपल्या सांस्कृतीचे जतन करणारे हे राज्य सुख, शांती, प्रेम करुणेचा संदेश देणारे आहे.व्होटबँकेसाठी देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्ननागरिकता संशोधन कायदा (सीएए) ला होत असलेल्या विरोधाबद्दल नामग्याल म्हणाले व्होटबॅँकेसाठी देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माचे राजकारण करणारे पक्ष आज धर्मनिरपेक्षतेची शिकवण देत आहे. जे कधी भारतीय तिरंगा व संविधानावर बोलत नव्हते, ते आज संविधान धोक्यात असल्याचे सांगत, तिरंगा घेऊन फिरत आहे. वीर सावरकरांवर टीका केली जात आहे. हे सर्व ‘मोदी है तो मुमकिन है’ चे उदाहरण आहे.पाकिस्तान, चीनचा कब्जानामग्याल म्हणाले लद्दाखच्या काही भागावर चीन व पाकिस्तानचा कब्जा आहे. पाकिस्तानने लद्दाखचा ५ हजार वर्ग किलोमीटरचे क्षेत्र चीनला दिले आहे. अक्साई चीन हा भारताचा भाग होता, तोही चीनला दिला. लद्दाख- तिब्बत सीमा वाद मोठा करण्यात आला. मोदी सरकारच्या कार्यकाळात सध्या घुसखोरीला लगाम लागला आहे. आता लोक बॉर्डर पार करण्यास भित आहे. भारत आता सर्जिकल स्ट्राईक करून शत्रूचा सफाया करीत आहे.
लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित : खासदार नामग्याल यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 1:07 AM
लद्दाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी दावा केला की, लेह लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित होईल. या परिसरात राष्ट्रवादाची भावना आहे. येथील लोक देशासाठी बलिदान देण्यास तयार आहे. ते म्हणाले सरकारने कलम ३७० काढल्यानंतर लद्दाखने विकासाची गती पकडली आहे.
ठळक मुद्देकलम ३७० काढल्याने बदलली दशा