शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

तलावांनी घेतला मोकळा श्वास, पाण्याची स्थिती सुदृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 10:22 PM

Clean Lake, Ganesh Fesival, Nagpur News पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने गणपती विसर्जनाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी शुक्रवारी फुटाळा, सोनेगाव, शुक्रवारी व सक्करदरा तलावांच्या पाण्याचे परीक्षण केले. परीक्षणानंतर तलावातील पाण्याची स्थिती सुदृढ आढळून आली. या स्थितीवरून, गेल्या आठ वर्षात प्रथमच शहरातील तलावांनी मोकळा श्वास घेतल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देगणपती विसर्जनापूर्वी आणि नंतरच्या जलपरीक्षणात झाला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनने गणपती विसर्जनाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी शुक्रवारी फुटाळा, सोनेगाव, शुक्रवारी व सक्करदरा तलावांच्या पाण्याचे परीक्षण केले. परीक्षणानंतर तलावातील पाण्याची स्थिती सुदृढ आढळून आली. या स्थितीवरून, गेल्या आठ वर्षात प्रथमच शहरातील तलावांनी मोकळा श्वास घेतल्याचे स्पष्ट झाले.फुटाळा, शुक्रवारी, सोनेगाव तलाव (तिन्ही तलावांचे ४.५ मिलिग्रॅम/लिटर) आणि सक्करदरा तलावात (३ मिलिग्रॅम/लिटर) गणपती विसर्जनापूर्वी आणि नंतर डिसॉल्ड आॅक्सिजन मात्र समान प्रमाणात दिसून आला. गेल्या दोन महिन्यात उत्तम पावसामुळे फुटाळा, सोनेगाव व शुक्रवारी तलाव तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळेही या तलावांतील गढूळपणा (टर्बिडिटी) काहीअंशी घसरलेला आहे.ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन गेल्या आठ वर्षापासून अर्थ इको इंटरनॅशनल नामक आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत शहरातील प्रमुख तलावांमध्ये गणपती विसर्जनाच्या परिणामाची तपासणी करत असल्याचे टीम लिडर सुरभी जायसवाल यांनी सांगितले. महानगरपालिकेद्वारे या वर्षी सर्वच तलावांमध्ये विसर्जनावर निर्बंध घातल्यामुळेच, हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षी फुटाळा तलावात ऑक्सिजन मात्रा घसरली होतीगेल्या वर्षी गणपती विसर्जनानंतर फुटाळा तलावाची स्थिती अत्यंत दयनीय होती. येथे डिसॉल्ड आॅक्सिजनची मात्रा घसरून ३.५ मिलिग्रॅम/लिटर पर्यंत पोहोचली होती. शुक्रवारी तलावात ही मात्रा ४ मिलिग्रॅम/लिटरपर्यंत घसरली होती. तलावांमध्ये डिसॉल्ड ऑक्सिजनची मात्रा सर्वसाधारणपणे ६ मिलिग्रॅम/लिटर असायला हवी, असे सुरभी जायसवाल यांनी सांगितले.सक्करदरा तलावाचे परितंत्र धोक्यातसक्करदरा तलावात पाणी कमी आहे आणि चहूबाजूंनी जलकुंभी परसली आहे. त्यामुळे, या तलावाची साफसफाई होणे गरजेचे आहे. अन्यथा तलावाचे परितंत्र पूर्णत: ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख तलावांमध्ये कृत्रिम एरेशन सिस्टिम लावण्याची गरज आहे. या सिस्टिममुळे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा वाढवणे शक्य असल्याचे ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे डिप्टी टीम लीडर मेहुल कोसुरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावGanesh Mahotsavगणेशोत्सव