माैदा : चाेरट्याने कंपनीच्या आवारात प्रवेश करीत आतील तीन टन लाेखंड चाेरून नेले. त्या लाेखंडाची एकूण किमती ९० हजार रुपये आहे. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डमरी शिवारात नुकतीच घडली.
डमरी शिवारात शिवगंगा स्टील नामक कंपनी असून, त्यात लाेखंडापासून काही साहित्य तयार केले जाते. अज्ञात चाेरट्याने त्या कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या खालून माेठे छिद्र तयार केले आणि त्यातून त्याने कंपनीच्या आवारात प्रवेश केला. येथून त्याने तीन टन लाेखंड वाहनात टाकून चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच कंपनीचे सुुपरवायझर सुरेश चंदानी (५५, रा. नागपूर) यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. त्या लाेखंडाची एकूण किंमत ९० हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस हवालदार काळे करीत आहेत.