नियमित तस्करी : भंडाफोड होताच अनेकांचे पलायननरेश डोंगरे नागपूरमुंबईहून दर महिन्यात १५ ते २० लाख रुपयांचे कोकेन नागपुरात येत होते. येथून त्याची विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नियमित तस्करी केली जात होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मादक पदार्थाच्या तस्करी प्रकरणात केबल आॅपरेटर बबलू शेख आणि हिवरीनगरातील सचिन अंबागडे या कुरियर बॉयला गुन्हेशाखेने अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपींना गुरुवारी कोर्टात हजर करून त्याचा पाच दिवसांचा पीसीआर मिळवला आहे. बोगस पासपोर्टसह देशभरात प्रवास करणाऱ्या एका नायजेरियन तरुणाला सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. सोनेगाव पोलिसांच्या अटकेत असताना त्याने अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला. तो स्रीफर-ब्रजेशसह देशभरात कोकिनची तस्करी करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधणे सुरू केले. त्यानंतर मुंबईतून नियमित कोकेनची खेप नागपुरात आणणाऱ्या हिवरीनगरातील सचिनचे नाव पुढे आले. सचिनच्या चौकशीतून बबलू शेखचे नाव उघड झाले. काही दिवसांपूर्वी कोकेनची खेप आणायला गेलेल्या सचिनला बबलूनेही ३० हजार रुपये दिले होते, ही माहिती उघडकीस झाली. त्यासोबतच मुंबईहून ब्रजेश-स्रीफर जोडगोळीकडून वेळोवेळी कोकेनची खेप मागवून घेणाऱ्या अनेकांची नावे उघड झाली. त्यामुळे पोलिसांनी अटकेची तयारी केली.गोंदियाचा तस्कर पळाला अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोकेनच्या तस्करीत सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यासाठी बुधवारी रात्री ठिकठिकाणी सापळे लावले. त्यात सचिन अडकला. बबलूला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रकरणाशी संबंधित असलेल्या अनेकांनी बबलू शेखचे अपहरण झाल्याची वार्ता पसरवली.
मुंबईहून लाखोंचे कोकेन नागपुरात
By admin | Published: October 21, 2016 2:34 AM