लोकमत चौकाजवळ राहणारे नवींदरसिंग दिवानसिंग खुराणा (वय ६६) यांच्या मोबाईलवर फोन करून अज्ञात आरोपीने त्यांच्या खात्यातून दोन लाख ६० हजार रुपये लंपास केले. शनिवारी दुपारी १ ते २.१५ च्या दरम्यान हा गैरप्रकार घडला. तो लक्षात आल्यानंतर खुराणा यांनी बजाज नगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आरोपीने स्वतःची ओळख बीएसएनएलचा कर्मचारी म्हणून दिली होती.
मॅक्स लाइफ इन्शुरन्स मधून बोलतो असे सांगून सायबर गुन्हेगाराने दिलीप तुळशीराम देवतारे (वय ६१, रा. मेडिकल चौक) यांना वार्षिक प्रीमियम एकत्र भरल्यास १० डिस्काउंट मिळेल असे सांगितले. देवतळे यांनी आरोपीवर विश्वास ठेवून ३१ डिसेंबर २०२० ला एक लाख ३३ हजार रुपये भरले. चार महिन्यांपेक्षा जास्त अवधी होऊनही कंपनीकडून पैसे भरल्याची पावती न आल्यामुळे देवतारे यांनी इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली. तेव्हा त्यांना आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. त्यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
--