सावनेर : चाेरट्याने घरफाेडी करीत साेन्याचांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण २ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना सावनेर शहरातील सटवा माता मंदिर परिसरात शनिवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आली.
संगीता कचरू छत्रे (४०, रा. सटवा माता मंदिर परिसर, सावनेर) या नातेवाईकाचे निधन झाल्याने कुटुंबीयांसह हिंगणा येथे गेल्या हाेत्या. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराचे कुलूप व कडी ताेडून आत प्रवेश केला आणि कपाटातील २ लाख २६ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये राेख असा एकूण २ लाख ४६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच संगीता छत्रे यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी अज्ञात आराेपी विरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक कविता सावळा करीत आहेत.