लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांमध्ये विषाणुजन्य लम्पी स्कीन डिसिज साथीच्या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली आहेत. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड व कीटक आदीमुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये रोगाचा प्रसार होत आहे. हा संक्रमित आजार असल्याने त्याला अटकाव घालण्यासाठी जि.प. चा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.जनावरांच्या डोळ्यातून, नाकातून पाणी येणे, लसिका ग्रंथीला सूज येणे, भरपूर ताप येणे, त्वचेवर १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येणे आदी लक्षणे या आजाराची आहेत. या विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर एक-दोन आठवड्यापर्यंत त्याचे परिणाम दिसून येतात. जिल्ह्यात हा संसर्ग २० टक्क्यापर्यंत जनावरांमध्ये झाला आहे. याचे मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे. मात्र गोपालक व शेतकरी बांधवांनी सतर्क राहण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. निरंजन शेटे उपस्थित होते.विलगीकरणाचे आवाहनहा आजार संक्रमित असल्याने जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्या जनावराचे विलगीकरण करावे. त्या जनावराला इतर जनावरासोबत बांधू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले. शिवाय उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतच्या सहकार्याने जनावरांच्या गोठ्यात बाह्य कीटक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. गावागावात शिबिर घेऊन उपचार करण्यात येत आहेत. गावागावामध्ये जनजागृतीचे उपक्रम सुरू आहेत.
नागपूर जिल्ह्यातील जनावरांना ‘लम्पी’चा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:30 AM
जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांमध्ये विषाणुजन्य लम्पी स्कीन डिसिज साथीच्या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली आहेत. चावणाऱ्या माशा, डास, गोचीड व कीटक आदीमुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांमध्ये रोगाचा प्रसार होत आहे.
ठळक मुद्देसंकरित जनावरे पडताहेत बळी : पशुसंवर्धन विभाग सतर्कजनावरांच्या विलगीकरणाचे पशुपालकांना आवाहन