शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

बोगस कागदपत्रांद्वारे जमिनीचा फेरफार

By admin | Published: January 12, 2015 1:03 AM

तालुक्यातील बारई (बरेजा) समाजबांधवांच्या उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश राजवटीत १८९२-९५ च्या काळात २३६ एकर जमिनीची पारशिवनी बरेजा प्रगणे भिवगड नावाने शासन दप्तरी नोंद आहे.

बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप चंद्रशेखर गिरडकर - पारशिवनी तालुक्यातील बारई (बरेजा) समाजबांधवांच्या उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश राजवटीत १८९२-९५ च्या काळात २३६ एकर जमिनीची पारशिवनी बरेजा प्रगणे भिवगड नावाने शासन दप्तरी नोंद आहे. ही जमीन बरेजा समाजबांधवांना नाममात्र भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. स्थानिक तहसील कार्यालयात बोगस कागदपत्र सादर करून या जमिनीचा फेरफार करण्यात आल्याचा आरोप बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.बारई (बारी) समाजबांधवांनी १८९२ ते ९५ च्या काळात ‘वाजीब-उल-अर्ज’च्या घटनेनुसार सर्वानुमते बरेजा पंच कमिटी या नावाने संचालक मंडळ नेमले. ‘वाजीब-उल-अर्ज’नुसार २८३ पट्टेदार सभासदांमधून नंबरदार निवडून त्यांच्याकडे संस्थेच्या चल-अचल संपत्तीची देखरेख असायची. यात मालगुजार, पाटील, वहिवाटदार व आता येथे अध्यक्षप्रणाली अस्तित्वात आहे. त्यानुसार सन २०११ पासून या बरेजा पंच कमिटीचे अध्यक्ष म्हणून वसंत महाजन, सचिव केशव पोकळे यांचे संचालक मंडळ कार्यरत होते. या मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०१४ मध्ये संपला असताना, संबंधित संचालक मंडळाने बरेजा पंच कमिटीची मालमत्ता खाजगी समजून घटनेची नियमावली धाब्यावर बसवून, सन २०१३ मध्ये संस्थेचे नाव ‘नागवेल पान उत्पादक संस्था’ असे नामकरण करून मूळ जमिनीच्या सातबारावर नागवेल पान उत्पादक तथा कृषी संयुक्त सहकारी संस्था म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे सातबारावर फेरफार केला. याचा फेरफार क्र. ३, ५ जुलै २०१३ नुसार नोंद आहे. या संस्थेची अधिकृतपणे कुठेही नोंद नाही.सन २०१३-१४ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीवर काही पट्टेदारांनी आक्षेप घेतला. बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक तलाठ्याला या जमिनीचा अभिलेख, सातबारा, आठ अ व नकाशाची मागणी केली. तलाठ्याने दिलेल्या सातबाराप्रमाणे सर्वे क्र. ५, ६, ६८ या अभिलेखावर बरेजा पंच कमिटी संस्थेच्या नावाऐवजी नागवेल पान उत्पादक तथा कृषी संयुक्त सहकारी संस्था मर्यादित, खातेदार एकूण २१४ असा उल्लेख केला असून, या जमिनीचे मूळ मालक बदलविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल) रामटेक, तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना १०० पट्टेदारांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. या संस्थेचे आज वारसान हक्काप्रमाणे ४५० पट्टेदार सभासद आहेत. महसूल विभागातील दस्तऐवजावरील नोंदीनुसार या जमिनीवर बरेजा पंच कमिटीचा सामूहिक मालकी हक्क आहे. पूर्वी वाजीब-उल-अर्जनुसार पट्टेदारांमधून नंबरदार निवडून त्याच्याकडे संस्थेची व मालमत्तेची देखरेख असे. या जमिनीचा फेरफार करण्यात आल्याने पट्टेदार सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.