शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

२५ कोटींची जमीन हडपण्याचा डाव अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:41 AM

बनवाबनवी करून २५ कोटींची जमीन अवघ्या साडेतीन कोटीत हडपण्याचा प्रयत्न करणारा आरोपी बिल्डर सागर रतन याने आणखी किती जणांची आणि ...

ठळक मुद्देआरोपी बिल्डर, सोसायटी सचिवाचा पीसीआर वाढला : चौकशीत आरोपी दिशाभूल करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनवाबनवी करून २५ कोटींची जमीन अवघ्या साडेतीन कोटीत हडपण्याचा प्रयत्न करणारा आरोपी बिल्डर सागर रतन याने आणखी किती जणांची आणि कुठली कुठली जमीन हडपली, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, या दोघांनी पोलीस कोठडीतील चौकशीत पोलिसांची दिशाभूल करण्याचे तंत्र अंगिकारले आहे. तसा अहवाल पोलिसांनी न्यायालयात आज सादर केल्यामुळे या दोघांना न्यायालयाने आणखी २८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बेसा येथे १९८७-८८ मध्ये मिलिंद सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. तत्कालीन सचिव शालिकराम ढोरे यांनी सोसायटीच्या मालकीची ४ एकर जागा ७० भूखंडधारकांना विकली. २००३ मध्ये ढोरे यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या उपस्थितीत संदीप विश्वलोचन जैन यांना अध्यक्ष तर त्यांचे मेव्हणे विकास रामचंद्र जैन यांना सोसायटीचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. कालांतराने आरोपी विकास जैनने आपल्या नातेवाईकांना सोसायटीचे सदस्य बनवून या कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा केला. न्याय मिळवण्यासाठी पोलिसांसह विविध विभागात तक्रारी केल्यानंतर पीडित भूखंडधारकांनी सहकार विभागाकडेही धाव घेतली. कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर ३१ मार्च २०१७ ला सोसायटीवर अवसायक नेमण्यात आला. त्याची माहिती कळताच सोसायटीचा सचिव विकास जैन याने आरोपी बिल्डर सागर रतन सोबत संगनमत केले. त्यानंतर मिलिंद सोसायटीची सुमारे २५ कोटींची जमीन केवळ ३ कोटी ५७ लाखात हडपण्याचा सागर रतनने कट रचला. विक्री करून घेतल्यानंतर ५ एप्रिलला जमिनीच्या ७/१२ वर आपले नाव नोंदवून तेथे बांधकामही सुरू केले.दरम्यान, ग्वालबन्सी प्रकरणानंतर पीडित भूखंडधारकांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. त्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी करून गुन्हा दाखल केला.२२ आॅगस्टला, मंगळवारी रात्री रतन आणि जैनला पोलिसांनी अटक केली. त्यांची दुसºया दिवशी पोलीस कोठडी मिळवली. चार दिवसांच्या चौकशीत बिल्डर रतनने पोलिसांसोबत टाइमपासचा खेळ चालविला आहे. आपल्याला सोसायटीसोबत भूखंडधारकांचा वाद असल्याची माहितीच नसल्याची बतावणी तो करीत आहे. आपली सर्व कागदपत्रे बरोबर असून, पैसे देऊन जमीन घेतल्याचा युक्तिवाद तो करीत आहे. आरोपींनी अशाच प्रकारे आणखी अनेकांसोबत बनवाबनवी केली असावी, असाही संशय आहे. त्यामुळे पोलीस त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत आहेत.मात्र, बिल्डर रतन अनेक प्रश्नांची उत्तरे टाळताना तो दिशाभूल करणारी माहितीही देत आहे. जैनसुद्धा असाच प्रकार करीत असल्याने पोलिसांना पाहिजे तशी माहिती किंवा कागदपत्रे उपलब्ध झालेली नाही. दरम्यान आज शनिवारी त्यांच्या कोठडीचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसून, दिशाभूल करीत असल्याचे सांगून पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींची कोठडी २८ आॅगस्टपर्यंत वाढवून दिली.बिल्डर रतनचे म्युटेशन रद्दआरोपीने कटकारस्थान करून ही फसवणूक केली आहे आणि जमिनीच्या ७/ १२ वर नाव चढविले आहे, याचा माहितीवजा अहवाल एसआयटीने महसूल खात्याला पाठविला. उपविभागीय अधिकाºयांनी (एसडीओ) त्यावर तात्काळ कारवाईचा पवित्रा घेतला आणि भूमिअभिलेख विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार भूमिअभिलेख विभागाने त्या जमिनीच्या ७/ १२ वर आरोपी सागर रतनचे झालेले नामांतर (म्युटेशन) रद्द केले.