शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नागपुरात जमिनीच्या व्यवहारात ४३ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 12:21 AM

दीड कोटी रुपयांत ५२ एकर जमीन देण्याची बतावणी करणाऱ्या एका टोळीने बांधकाम व्यावसायिक आणि सहकाऱ्यांची  ४३ लाखांनी फसवणूक केली.

ठळक मुद्दे५२ एकर जमीन देण्याची बतावणी : महिलेसह आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीड कोटी रुपयांत ५२ एकर जमीन देण्याची बतावणी करणाऱ्या एका टोळीने बांधकाम व्यावसायिक आणि सहकाऱ्यांची  ४३ लाखांनी फसवणूक केली. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या सौद्याचा व्यवहार वादग्रस्त झाल्यामुळे प्रकरण सीताबर्डी पोलिसांकडे पोहचले. त्यावरून पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.जवाहर नवनीत कोठारी (वय ५६) हे या प्रकरणात तक्रारदार आहेत. ते तिरुपती रेसिडेन्सी मनीषनगर येथे राहतात. ते बांधकाम व्यावसायिक असून सीताबर्डीत त्यांचे कार्यालय आहे. मोहम्मद इकबाल हाजी मुसानी यांच्या मध्यस्थीने त्यांच्याकडे डिसेंबर २०१४ मध्ये आरोपी मुकेश राऊत याच्या जमिनीचा सौदा आला. १९ डिसेंबर २०१८ ला कोठारी यांच्या कार्यालयात राऊत याने मौदा हद्दीतील ५२ एकर शेती १ कोटी ५१ लाखांत विकण्याचा सौदा केला. कोठारी यांनी आपल्या चार सहकाºयांना सोबत घेऊन मोहम्मद इकबाल हाजी मुसानी यांच्या मध्यस्थीने जमीनमालक सुभाष गोविंद ढवळे, प्रकाश पंजाबराव राऊत, मोहम्मद जावेद सत्तार आणि राजेंद्र नारायण जाधव यांच्यासोबत जमीन खरेदीचा सौदा पक्का केला. यावेळी त्यांनी उपरोक्त आरोपींनी टोकन म्हणून पाच लाख रुपये दिले. त्यानंतर जमीन खरेदीचा करारनामा करून जमीनमालकांना ३१ लाख ७० हजार ३४३ रुपये चेकद्वारे दिले. त्यानंतर जमीन साफ करण्यासाठी आणि मोजणी करण्यासाठी मुकेश राऊत आणि इकबालभाई यांना ६ लाख ४६ हजार ९१५ रुपये दिले. अशाप्रकारे कोठारी यांनी आरोपींना एकूण ४३ लाख १७,२५८ रुपये दिले. आता या सौद्याला पाच वर्षे झाली, मात्र ती जमीन कोठारी यांच्या नावे आरोपींनी करून दिली नाही. आरोपी विनोद गवई आणि इकबालभाई यांनी कोठारी यांना फार्म हाऊसमध्ये भागीदारी करून आपण धंदा करू असे म्हटले. त्यामुळे इतर लोकांनी नवीन अरुणोदय असोसिएट नावाने फर्म बनवून पार्टनरशिप डीड तयार केली. रामनगर येथील कार्यालयात त्यांनी जमिनीची मूळ कागदपत्रे इकबालभाई यांच्या ताब्यात दिली. आरोपी मुकेश राऊत, इकबालभाई, प्राची विनोद गवई आणि प्रकाश श्रीधर पाबले तसेच उपरोक्त जमीनमालकांनी संगनमत करून ती जमीन आपल्या नावावर करून कोठारी यांचा विश्वासघात केला.ते चौघे कोण?१९ डिसेंबर २०१४ ते ९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत आरोपींनी रक्कम हडपली म्हणून कोठारी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाने सीताबर्डी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस आता आरोपींवर कधी कारवाई करतात, त्याकडे लक्ष लागले आहे. दुसरे म्हणजे या प्रकरणात कोठारी यांच्यासोबत अन्य चार जण कोण आहेत, तेसुद्धा पोलिसांकडून उघड करण्यात आलेले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूर