लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हैदराबाद विमानतळावर सोमवारी सकाळी दाट धुके असल्यामुळे दोन विमानांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘लॅन्डिंग’ झाले. यात कोची-हैदराबाद व जयपूर-हैदराबाद या विमानांचा समावेश होता व दोन्ही विमाने ‘इंडिगो एअरलाईन्स’ची होती. ‘६ई-६४४ कोची-हैदराबाद’ विमान ९ वाजता नागपुरात उतरले व पाऊण तास थांबल्यानंतर हैदराबादकडे रवाना झाले. तर ६ई-६१५१ जयपूर-हैदराबाद विमान सकाळी ९.०९ वाजता नागपुरात ‘लॅन्ड’ झाले व १० वाजताच्या सुमारास हैदराबादकडे झेपावले.दरम्यान नागपुरात येणारी तीन विमाने अर्धा ते दीड तास उशिराने पोहोचली. ‘एअर इंडिया’चे एआय ४६९ रायपूर-नागपूर विमान १.२२ तास उशिराने आले. तर इंडिगोचे ६ई-४०३ मुंबई-नागपूर विमान अर्धा तास उशिराने ‘लॅन्ड’ झाले. ‘गोएअर’चे जी८-८१२ बंगळुरू-नागपूर विमान माहिती मिळेस्तोवर सव्वातास उशिराने ‘लॅन्ड’ होणार होते.
हैदराबादला जाणाऱ्या दोन विमानांचे नागपुरात 'लॅन्डिंग'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 10:54 PM