शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

भूमाफिया हादरले

By admin | Published: April 27, 2017 1:52 AM

दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या साथीदाराविरुद्ध दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमुळे शहरातील भूमाफिया हादरले आहेत.

ग्वालबन्सीवर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा प्रयत्न नागपूर : दिलीप ग्वालबन्सी व त्याच्या साथीदाराविरुद्ध दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमुळे शहरातील भूमाफिया हादरले आहेत. ग्वालबन्सी व त्याच्या साथीदाराविरुद्ध आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे ग्वालबन्सी दीर्घ काळापर्यंत तुरुंगात राहण्याची वेळ आली आहे तर इतर भूमाफियांना त्यांच्यावरही कारवाई होण्याची भीती सतावत आहे. दिलीप ग्वालबन्सी व त्याचा साथीदार माजी नगरसेवक राजेश माटे मनपा कंत्राटदार भूपेश सोनटक्के यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपात अटकेत आहे. दोघेही २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. २४ एप्रिल रोजी गिट्टीखदान पोलिसांनी कळमेश्वर येथील रहिवासी रुखमाबाई गजानन वैद्य (६०) यांची शेती हडपल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यात दिलीप ग्वालबन्सी, त्याचे दोन पुतणे, साथी शरद ऊर्फ बबलू तिवारी, सरजू मंडपे आणि कळमेशवरचे नगरसेवक नामदेव वैद्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शरद तिवारीला अटक केली असून २८ एप्रिलपर्यंत ताब्यात घेतले आहे. मंगळवारी मानकापूर आणि कोराडी पोलीस ठाण्यातही चार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. यात एक पीडित सेवानिवृत्त सहायक उपनिरीक्षक मनोहर देऊळकर आहेत. गोधनी येथील रहिवासी असलेले ६० वर्षीय देऊळकर यांचा गोरेवाडा येथे प्लॉट आहे. दिलीप ग्वालबन्सी, दया पांडे, त्याची पत्नी आणि एक साथीदार महिला यांनी दोन महिन्यांपूर्वी शिवीगाळ करीत देऊळगावकर यांना मारहाण केली होती. त्यांना त्यांच्याच प्लॉटवर जाऊ दिले नाही. मानकापूर पोलिसांनी मारहाण, धमकावणे, जमीन हडपणे आणि अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोधनी येथील ६२ वर्षीय केवलदास जामगडे यांची झिंगाबाई टाकळी येथे जमीन आहे. १० मार्च रोजी जामगडे यांनी नगर -भूमापनच्या कर्मचाऱ्यांना प्लॉटची मोजणी करण्यासाठी बोलावले होते. दिलीप ग्वालबन्सी, ईश्वर सुप्रेटकर ऊर्फ पहेलवान आणि त्याच्या १० ते १५ साथीदारांनी शिवीगाळ करून जामगडे यांना धमकावत प्लॉटची मोजणी करू दिली नाही. जामगडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण, धमकावणे, जमिनीवर कब्जा करणे आणि अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचप्रकारे ४८ वर्षीय महिलेचा गोरेवाडा येथे प्लॉट आहे. त्यांनी १९९१ मध्ये प्लॉट खरेदी केला होता. फेब्रुवारी महिन्यात दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी महिलेला त्यांच्या प्लॉटवर जाण्यापासून रोखले. महिलेला धमकावत आपत्तीजनक व्यवहार केला. महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी छेडखानी, मारहाण, जमिनीवर कब्जा करणे आणि अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचप्रकारे कळमेश्वर येथील प्रमोद मिश्रा यांचा कोराडी येथील नशेमन हाऊसिंग सोसायटीत प्लॉट आहे. दिलीप ग्वालबन्सी, जीतू अ‍ॅन्थोनी, पप्पू यादव, छोटू यादव आणि त्यांचे इतर साथीदारांनी मिश्रा यांना त्यांच्याच प्लॉटवर जाण्यापासून रोखले. दिलीप ग्वालबन्सीने पिस्तुलचा धाक दाखवून धमकावले. तसेच प्लॉटवर जायचे असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील, अशी ताकीद दिली. मिश्रा यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ग्वालबन्सीविरुद्ध सातत्याने गुन्हे दाखल होत असल्याने आणि पीडित समोर येत असल्याने त्याचे साथीदारही हादरले आहेत. दरम्यान बुधवारी सायंकाळी त्याचे साथीदार पोलीस आयुक्तालयात आले. त्यांना कार्यालयात प्रवेश न मिळाल्याने त्यांनी रस्त्यावरच नारेबाजी सुरू केली. त्यांचे म्हणणे होते की, ग्वालबन्सी यांना बळजबरीने फसविले जात आहे. त्यांना मारहाण केली जात आहे. त्यांनी सहपोलीस आयुक्तांना निवेदन सादर करीत यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. आरोपींना वाचवण्यासाठी मुंबई- दिल्लीच्या चकरा ग्वालबन्सीला अटक झाल्यापासून या प्रकरणात स्थानिक राजकारणही प्रभावित झाले आहे. दोन नेत्यांनी आरोपींना वाचविण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यापैकी एक नेता राजेश माटेचा जवळचा आहे. तो मुंबईनंतर दिल्लीलाही जाऊन आला. अनेक भूमाफिया सक्रिय ग्वालबन्सीप्रमाणे शहरात अनेक गुन्हेगारांनी कित्येक जागांवर कब्जा करून ठेवला आहे. कब्जा सोडण्याच्या मोबदल्यात प्लॉट मालकाकडून वसुली केली जाते. त्याचप्रकारे वादातीत जागेची खरेदी विक्रीही केली जाते. या भूमाफियांनी अनेक शासकीय जागांवरही कब्जा केलेला आहे. त्या जागेवर झोपडपट्टी वसवून स्वत: ला गरिबांचे कैवारी म्हणवून घेतले जाते. शहर पोलीस अशा लोकांची एक यादी तयार करीत आहे. यांची सखोल चौकशी केल्यास असे अनेक भूमाफिया समोर येऊ शकतात. अशा लोकांनाही तुरुंगात पाठविण्याची मागणी होत आहे.