लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटका परिसरातील नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे उत्पादन शुल्क विभागानेधाड टाकून चारचाकी वाहनासह अवैध दारूसाठा जप्त केला. या प्रकरणात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना नारी भागात अवैध पध्दतीने दारू तस्करी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे धाड टाकली असता महिन्द्रा स्कॉर्पिओ (एम.एच.३१ बीबी ६५८६) यामध्ये मध्यप्रदेश राज्य निर्मित व तेथे विक्रीकरिता असलेला तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला उच्च प्रतीच्या ब्रॅन्डचे ७५० मिलीच्या रेड लेबल, ब्लेंडर प्राईड, रॉयल चॅलेंज व्हिस्की तसेच स्मिरअप वोडका, अॅब्सुलेट वोडका या ब्रॅन्डच्या ७२ सिलबंद बाटल्या आदी जप्त करण्यात आल्या.याप्रकरणी मुख्य आरोपी साहिल बालचंद तूरकर, राजकुमार लक्ष्मीप्रसाद रहांगडाले व इतर आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम ६५ (ए),(ई),८१,८३ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई , राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष खरे, उपनिरीक्षक विशाल कोल्हे, धनराज राऊत, जवान प्रकाश मानकर, अंकुश भोकरे, विनोद डुंबरे व महिला जवान धनश्री डोंगरे यांनी केली. याप्रकरणी निरीक्षक सुभाष खरे हे तपास करीत आहेत.
नागपुरातील नारीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:54 PM
जरीपटका परिसरातील नारी भागातील नागार्जुन कॉलनी येथे उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून चारचाकी वाहनासह अवैध दारूसाठा जप्त केला.
ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाची कारवाई