शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

उपकरणाअभावी रखडली ‘लेझर शस्त्रक्रिया’

By admin | Published: March 06, 2016 2:58 AM

चष्मा असल्याने लग्न जुळत नाही, पोलिसांत किंवा सैनिकात जाण्याची इच्छा असली तरी तिथे नोकरी मिळविण्यात अडचणी येतात.

मेडिकलचा नेत्र रोग विभाग : तीन कोटीच्या यंत्राची प्रतीक्षासुमेध वाघमारे नागपूरचष्मा असल्याने लग्न जुळत नाही, पोलिसांत किंवा सैनिकात जाण्याची इच्छा असली तरी तिथे नोकरी मिळविण्यात अडचणी येतात. अशाप्रकारचे प्रश्न केवळ चष्मा असल्यामुळे अनेकांना नेहमी भेडसावत असतात. लेझर किरणांद्वारे केल्या जाणाऱ्या अतिशय सोप्या शस्त्रक्रियेमुळे चष्मा पूर्णत: निघून जातो. नागपुरात अशा शस्त्रक्रिया गेल्या पाच वर्षांपासून खासगी इस्पितळांमध्ये होतात. परंतु याचा खर्च सामान्यांच्या अवाक्याबाहेरचा आहे. मेडिकलमध्ये ही शस्त्रक्रिया स्वस्त दरात करणे शक्य आहे, परंतु येथे ‘लॅसीक लेझर’ उपकरण नाही. तीन कोटींचे हे उपकरण उपलब्ध झाल्यास उपराजधानीसोबतच विदर्भातील विशेषत: अनेक मुलींच्या रखडलेल्या शस्त्रक्रिया होऊन त्यांना नवी दृष्टी देणे शक्य आहे. मुला-मुलीचे लग्न जुळवणे ही अत्यंत कठीण गोष्ट असते. विशेषत: मुलीच्या लग्नाच्या वेळी अनेक गोष्टी पाहिल्या जातात. त्यात जर मुलीला चष्मा लागला असेल तर अनेकदा पसंद येऊनही लग्नाला नकार दिला जातो. चष्मा असल्याने कुणीही पटकन लग्नास तयार होत नाही. याशिवाय चष्मा लागलेल्या व्यक्तींना चष्माशिवाय सर्व गोष्टी अंधूक अंधूक दिसतात. एखाद्या वेळी चष्मा कधी चुकून विसरल्यावर किंवा फुटल्यावर नवा चष्मा तयार होईपर्यंत होणारा खोळंबा हा देखील मनस्ताप देणारा ठरतो. यावर लेझर किरणांद्वारे शस्त्रक्रिया महत्त्वाची ठरते. उपराजधानीत काही मोजक्या इस्पितळांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात येते. १८ व्या वर्षांपासून अगदी पन्नाशी पार केल्यावरही डोळ्यावर ही शस्त्रक्रिया करून चष्म्यापासून मुक्ती मिळवता येते. पाच मिनिटांच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला आयुष्यात पुढे कधीही चष्मा लावण्याची गरज पडत नाही. याशिवाय सकाळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुपारी रुग्णाला रुग्णालयातून घरीही सोडण्यात येते. परंतु याचा खर्च सुमारे ४० हजारावर आहे. सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परवडण्याजोगा नाही. यामुळे अनेक रुग्ण मेडिकलच्या नेत्ररोग रुग्णालयात या शस्त्रक्रियेची विचारणा करतात. परंतु तीन कोटीचे ‘लॅसीक लेझर’ उपकरण नसल्याने रुग्णांना रिकाम्या हाती परतावे लागते. अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त डोळ्यावर उपचार करण्याची ही उपचार पद्धत राज्यात केवळ मुंबईच्या शासकीय रुग्णालय जे.जे. येथेच आहे. सामान्यांना येथे जाणे-येणे करून उपचार घेण्याचा खर्च परवडणारा नाही. मेडिकलला हे उपकरण मिळाल्यास रुग्णालयात सुमारे दहा हजार रुपयांमध्ये दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करणे शक्य आहे.‘लॅसिक लेझर’साठी पाठविला प्रस्तावमेडिकलच्या नेत्ररोग विभागाने महिनाभरापूर्वी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तीन कोटींच्या ‘लॅसीक लेझर’ उपकरणाचा प्रस्ताव अधिष्ठात्यांकडे पाठविला आहे. रक्कम मोठी असल्याने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातल्यास याचा फायदा सामान्य रुग्णांना विशेषत: ज्यांची चष्म्यांमुळे लग्न रखडलेली आहे त्यांना होण्याची शक्यता आहे.