शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

हुई शाम उनका खयाल आ गया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:35 PM

निळसर चक्रदळ अदृष्य होताना मन उगाच काहुरते. चांदण्यांना पारपत्र मिळते मग आकाशाच्या फलाटावर यायला. टिमटिमत्या प्रकाशाला घेऊन त्या लाजत मुरडत येतात. काही मात्र अजिबात लाजत नाहीत..

श्रेया अभिजीत सरनाईकनागपूर दिवेलागणीची कातरवेळ. अस्तांचलाला जाणाऱ्या सूर्यकिरणांनी जाता जाता रांगोळी सांडवलेली.. बहुतेक त्याच्या सप्त घोड्याच्य खुरांनी हा गोंधळ घातला असावा. त्याच्या रंगडबीतले जादुई केशरी, गुलाबी रंग असे आकाशाच्या लांबलचक फलाटावर उधळले गेले की थोडावेळ मस्त वाटते.पुढच्या नीरव शांततेच्या आधीची ही रंगपंचमीच जणू. मग दिवसभर काम करून थकलेला हा कुटुंबप्रमुख लगबगीने आपले सगळे आटोपून घराकडे जायला निघतो. सगळी किरणेही आपले क्षितिज विस्तारणारे पंख आवरून गाढ झोपी जातात. अगदी छोट्या बाळासारखी पाय मुडपून झोपतात.निळसर चक्रदळ अदृष्य होताना मन उगाच काहुरते. चांदण्यांना पारपत्र मिळते मग आकाशाच्या फलाटावर यायला.टिमटिमत्या प्रकाशाला घेऊन त्या लाजत मुरडत येतात. काही मात्र अजिबात लाजत नाहीत.. पूर्ण चमचमणारं सौंदर्य घेऊन कॅटवॉक करत येतात आणि मिरवतात.अशी एखादी दूरस्थ चांदणी एखाद्याचे देवालय असू शकते.या संधाकाळच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये उदासीनताही सोबत येते. पाखरथवे अंधार व्हायच्या आधीच परतू लागली असतात. या पाखरथव्यांना कधी बेपत्ता दिशांचे धोके होत नसतील का... चोचीत दाणे घेऊन ही पाखरे दुसºया दिवशीची स्वप्न पंखांमध्ये भरून घरट्याकडे परततात. एक संध्याछाया गडद दाटून येते. एखाद्या काळ््या शाईची दौत अलगद कलंडावी असा अंधार हळूहळू पसरत जातो. काजव्यांचे झाड भरत जाते. आकाशातले तुटलेले तारे पुन्हा जन्म घेत असावेत का काजवा होऊन?काजवा क्षणभर चमकावा तशी एखादी आठवण चमकून जाते. या आठवणी हत्तींच्या पायासारख्या असतात. खोलवर रुतून बसणाºया, न बोलताच हटकून येणाºया.आयुष्यातून निघून गेलेले क्षण, माणसे मग या क्षणांची दावेदार असतात. जळण्यासाठी दिव्यांची गरजच ती काय..शाम होते ही चिरागों को बुझा देता हूँ.एक दिल ही काफी है तेरी याद में जलाने के लियेकायमचे मुक्कामाला निघून गेलेले क्षण, आठवणी. त्या आठवणींनी धरून ठेवलेली माणसं पुन्हा वर्तमााच्या चिमटीत धरता येत नाहीत.मग वाटतं,हुई शाम उनका खयाल आ गयावही जिंदगी का सवाल आ गया..वाºयाच्या मंद झुळुकीसोबत दूर कुठेतरी गाण्याचे सूर ऐकू येत आहेत..वो दिल कहाँ से लाऊं.. तेरी याद जो भुला दे..खरंच असं काळीज कुठून आणायचं असतं.

 

 

टॅग्स :Natureनिसर्ग