शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

राज्यात मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांनी घेतले २१७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 7:23 PM

गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.

ठळक मुद्देदोन हजारांवर नागरिक जखमी कोट्यवधींच्या पिकाची नासधूस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील पाच वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर दोन हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले.  माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. मागील पाच वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किती नागरिकांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले, पीडित किंवा त्यांच्या नातेवार्इंकांना किती नुकसानभरपाई देण्यात आली, पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१३ सालापासून ते डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांचा बळी गेला तर २ हजार १७६ नागरिक जखमी झाले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईपोटी १४ कोटी ८ लाख रुपयांची मदत करण्यात आली. तर जखमींना ८ कोटी २४ लाख ५५ हजार रुपये देण्यात आले. सरासरी एका मृताच्या कुटुंबीयांना ६ लाख ४८ हजार ८४७ रुपयांची तर प्रत्येक जखमीला ३७ हजार ८९२ रुपयांची मदत मिळाली.पिकांच्या नुकसानीची लाखांहून अधिक प्रकरणेवन्यप्राण्यांनी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करण्याचे प्रकारदेखील होताना दिसून येतात. गेल्या पाच वर्षांत अशाप्रकारे नुकसान झालेली १ लाख १४ हजार ३६३ प्रकरणे नोंदविण्यात आली. नुकसानभरपाईपोटी संबंधित शेतकऱ्यांना ४३ कोटी १४ लाख ९२ हजार रुपयांची मदत देण्यात आली.३० हजार पाळीव प्राणी भक्ष्यस्थानीएप्रिल २०१३ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ३० हजार ६२५ पाळीव प्राणी वन्यप्राण्यांच्या भक्ष्यस्थानी पडले. मरण पावलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई म्हणून १६ कोटी २५ लाख १६ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तर ८३६ पाळीव जनावरे जखमी झाली व त्यांच्या मालकांना ९ लाख ४ हजारांची मदत देण्यात आली.वर्षनिहाय नागरिकांचे मृत्यू व जखमीवर्ष             मृत्यू              जखमी२०१३          ४६              ३९७२०१४          ३८              ४७१२०१५          ३९              ४८७२०१६          ५२               ६७४२०१७          ४२               १४७

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव