शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कुख्यात मंजित वाडेचे अखेर आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 7:46 PM

उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार मंजित वाडे याने शुक्रवारी, २१ जूनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मंजितच्या आत्मसमर्पण नाट्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देनागपुरातील बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा प्रमुख सूत्रधार मंजित वाडे याने शुक्रवारी, २१ जूनला पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मंजितच्या आत्मसमर्पण नाट्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.गुरुवारी २५ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपी लिटिल सरदार, मंजित वाडे आणि साथीदारांनी बॉबी माकन यांचे अपहरण केले होते. त्यांना पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमध्ये बसवल्यानंतर त्यांची कार बेवारस अवस्थेत घरापासून काही अंतरावर सोडून दिली. मध्यरात्री बॉबीच्या मोबाईलवर त्यांच्या नातेवाईकांनी फोन केले. मात्र, १२ वाजून ५२ मिनिटानंतर त्यांचे तिन्ही फोन बंद होते. त्यामुळे २६ एप्रिलच्या दुपारी बॉबीच्या पत्नीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली होती. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. तातडीने शोधाशोध करण्याऐवजी मिसिंगची नोंद घेत गप्प बसणे पसंत केले. दरम्यान, २८ एप्रिलला बॉबीचा मृतदेह कोंढाळीजवळ सापडला. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या डझनभर पथकांना तब्बल आठ दिवस धावपळ करावी लागली होती. बॉबीचे अपहरण आणि हत्या करण्यासाठी ज्या इनोव्हा कारचा वापर झाला. त्या कारचा छडा लागल्यानंतर ३ मे रोजी कारचालक हनी चंडोकला मुंबईत जाऊन गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली देत आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार गुन्हे शाखेने कुख्यात गुंड लिटिल सरदार ऊर्फ शैलेंद्रसिंग गुरुचरणसिंग लोहिया (वय ४३, रा. अशोकनगर), त्याचा बॉडीगार्ड सिटू ऊर्फ हरजितसिंग गुरुबचनसिंग गौर (वय २८, रा. बिनाकी मंगळवारी), बाबू ऊर्फ गुरुमितसिंग बचनसिंग खोकर (वय ५६, रा.पाचपावली) आणि हनी ऊर्फ मनिंदरसिंग हरजिंदरसिंग चंडोक (वय ४४, रा. जरीपटका) या चौघांना अटक केली. दोन दिवसांनंतर परमजितसिंग ऊर्फ बिट्टू भाटिया या आरोपीला पुरावा नष्ट करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा मुख्य आरोपी कुख्यात गुंड मंजित वाडे (वय ५५) फरार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी पंजाब, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा येथे पोलिसांची पथके जाऊन परत आली. कुख्यात मंजितची अटक शहर पोलीस दलासाठी प्रतिष्ठेचा विषय ठरली होती. त्यासंबंधाने प्रयत्न सुरू असताना शुक्रवारी पोलिसांसमोर मंजितने आत्मसमर्पण केले. मंजितच्या आत्मसमर्पण नाट्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाणआले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक