लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: तुम्ही उत्तम पदार्थ बनवणारे अनेक शेफ पाहिले असतील, त्यांचे कार्यक्रम तुम्हाला आवडले असतील. मात्र अलिकडे सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या शेफचे नाव आहे, कोबे. कोबे ईटस या नावाने त्याचे व्हिडिओज इन्स्टाग्राम व यू ट्यूबव धुमाकूळ घालताहेत.. त्याला सध्या इन्स्ट्राग्रामवर आठ लाख फॉलोअर्स, टिकटॉकवर साडेतीन लाख तर यू ट्यूबवर दोन लाख फॉलोअर्स आहेत. एवढी सगळी संपदा त्याने अवघ्या ५५ व्हिडिओजमधून कमावली आहे.कोबे अमेरिकेतल्या व्हिर्जिनिया राज्यातील असून त्याचे वडील अॅश्ले व आई केयल यांनी त्याचे हे व्हिडिओ काढलेले आहेत. याची सुरुवात २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात झाली. कोबेला आपल्या आईला किचनमध्ये मदत करायला भारी आवडत होते. आई स्वयंपाक बनवायला लागली की त्याची लुडबूड सुरू व्हायची. त्याच्या या बाळलीलांचे कौतुक करताना त्यांनी त्याचे व्हिडिओज काढणे सुरु केले. सहजच त्यांनी ते इन्स्टाग्रामवर शेअर केले. पाहतापाहता त्याच्या खोडसाळ व हंसऱ्या चेहºयाने जगाला जिंकणे सुरू केले आणि त्याचे फॅन्स लाखोंच्या घरात जाऊन पोहचले.कोबे इटस या नावाने प्रसिद्ध असलेल्या या व्हिडिओजमध्ये तो केक, पेस्ट्री, पास्ता, पिज्झा आदी पदार्थ बनवताना दिसतो. मध्येच तो खोडसाळ हंसतो, मध्येच त्यातील एखादा पदार्थ तोंडात टाकतो आणि डोळे मिचकावतो..एकदा त्याची आई किचनमध्ये काम करत होती आणि कोबे तिची नक्कल करू लागला. तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण जेव्हा हे वारंवार दिसू लागले तेव्हा त्यांनी कोबेला आपल्या किचनमध्ये काम देणे सुरू केले आणि पाहता पाहता कोबे बनला जगातला सर्वात लहान व प्रसिद्ध शेफ.बॉलीवूडमध्येही कोबेचा बोलबालाबॉलीवूडच्या स्टार्सलाही कोबेची भुरळ पडली आहे. करण जोहर, आथिया शेट्टी, प्राची देसाई, रित्विक धनाजी यांच्यासह विद्या बालननेही कोबेचे कौतुक केले आहे. हे सगळेजण कोबेचे व्हिडिओज नेहमी पाहत असतात.
लेटेस्ट सेन्सेशन; अमेरिकेतला कोबे; एक वर्षाचा हसतमुख, खोडसाळ शेफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:26 PM
तुम्ही उत्तम पदार्थ बनवणारे अनेक शेफ पाहिले असतील, त्यांचे कार्यक्रम तुम्हाला आवडले असतील. मात्र अलिकडे सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या शेफचे नाव आहे, कोबे.
ठळक मुद्देविविध पाककृती करून करतोय मनोरंजनकोबे आता इतका प्रसिद्ध झाला आहे की, त्याचे व्हिडिओज लाखो लोक पाहत असतात. एवढेच नाही तर त्याच्या नावाचे टीशर्ट व स्टीकर्सही विक्रीला आले आहेत.