रामटेक : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनाेन्नती अभियानांतर्गत (उमेद) महिला सक्षमीकरणासाठी रामटेक तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. महिला बचत गटाच्या सदस्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री सुकर व्हावी म्हणून रामटेक शहरातील पंचायत समितीच्या प्रांगणात महिला बचत गटांच्या कोप शॉपचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे, पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, तालुका अभियान व्यवस्थापक शशिकांत तलमले, गेयेंद्र ठाकरे, समन्वयक अमोल मरसकोल्हे, वृशाली पडोळे, सुवर्णलता दिवटे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते. या शाॅपमध्ये अपेक्षा महिला बचतगटातील सदस्यांनी तयार केलेल्या शेवया, पापड, विविध खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. पहिल्या दिवशी ४,५०० रुपयांची विक्री करण्यात आल्याची माहिती महिला बचत गटाच्या सदस्यांनी दिली.