नागपूर : जुव्हेनॉर फार्मास्युटिकल्सने भारतीय ओटीसी (ओव्हर दि काऊंटर) ड्रग मार्केटमध्ये पदार्पण केले आहे. यानुसार कंपनीने नुकत्याच एका समारंभात आपल्या नव्या ओटीसी विभागाचा शुभारंभ केला. कार्यक्रमाला खासदार अजय संचेती, रेनबॅक्सी लेबॉरेटरीजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आणि हिरो मोटर्सचे माजी कार्यकारी संचालक अतुल सोबती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मायक्रोपार्क ग्रुपचे संचालक शंकर मेहाडिया, हेमांग पारीख, जुव्हेनॉर फार्मास्युटिकल्सचे उपाध्यक्ष विजय भास्कर रेड्डी, प्रदीप मेहाडिया, दिलीप पारीख, हितेश पारीख, अजित पारीख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विजय भास्कर रेड्डी यांनी सांगितले की, जुव्हेनॉर फार्मास्युटिकल्स ‘मायक्रोपार्क लॉजिस्टीक प्रा. लि.’चा उपक्रम आहे. ही मध्य भारतातील सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये अग्रभागी आहे. हा ग्रुप फार्मा डिस्ट्रीब्युशन, वेअर हाऊसिंग, आॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स डिस्ट्रीब्युशनच्या क्षेत्रात कार्यरत आहे. जुव्हेनॉर ओटीसी विभागाबद्दल बोलताना रेड्डी यांनी सांगितले की, या नव्या क्षेत्रात व्यवसायाची चांगली शक्यता आहे. याची मार्केट साईज ६.६ बिलियन युएस डॉलर आहे. कंपनी स्वस्त दरात क्वॉलिटी प्रोडक्ट उपलब्ध करून देण्यावर भर देते. फ्लॅगशीप ब्रँड ‘झटपट’च्या सहकार्याने ओटीसी विभाग कमीत कमी वेळात संपूर्ण भारतात आपली पाळेमुळे रुजविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शंकर मेहाडिया यांनी कंपनीच्या आगामी दहा वर्षाच्या योजनांची आणि कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीद्वारा चालविण्यात येणारे उपक्रम युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची माहिती दिली.खासदार अजय संचेती यांनी मायक्रोपार्कच्या प्रगतीवर संतोष व्यक्त करून या कंपनीच्या प्रमोटर्सची स्तुती केली. जुव्हेनॉर ओटीसी विभाग लवकरच नागपूरसह देशभरात उंची गाठणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतुल सोबती यांनी ओटीसी विभागाला शुभेच्छा दिल्या. (वा. प्र.)
जुव्हेनॉर फार्माच्या ‘ओटीसी’ विभागाचा शुभारंभ
By admin | Published: September 25, 2015 3:56 AM