शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
13
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
14
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
15
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

नेतृत्व गुणांची अनुभवातून शिकवण - कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी 

By आनंद डेकाटे | Published: March 18, 2023 4:04 PM

रासेयो राज्यस्तरीय प्रेरणा शिबिराचा समारोप

नागपूर : नेतृत्व गुण हे पुस्तकांमधून वाचून किंवा कोणी सांगितले म्हणून प्राप्त होत नाही. प्रत्यक्ष व्यवहार तसेच अनुभवातून नेतृत्व गुण विकसित होत असतात, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रेरणा-२०२३ हे राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबीर आयोजित करण्यात आले. पाच दिवसीय या शिबिराचा समारोप कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत सभागृह येथे करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव पिसे उपस्थित होते.- विद्यार्थ्यांनी पटकावले पुरस्कार

पाच दिवस घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये शिबिरार्थींनी पुरस्कार पटकावले. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार छत्रपती संभाजी नगर येथील अभिषेक दैठणकर, द्वितीय पुरस्कार सोलापूर येथील सौरभ वाघमारे तर तृतीय पुरस्कार अथर्व मात्रे याने प्राप्त केला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम पुरस्कार पुणे येथील क्रांती खरात, द्वितीय पुरस्कार नांदेड येथील अंजली शहाणे तर तृतीय पुरस्कार अकोला येथील गौरव घाटोळ याने प्राप्त केला.

देशभक्तीपर स्पर्धेत प्रथम पुरस्कार दर्शन, द्वितीय पुरस्कार आदित्य तर तृतीय पुरस्कार सर्वेशने प्राप्त केला. लोक नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिहिका, द्वितीय पुरस्कार अमरावतीची वंशिका सिरसाम तर तृतीय पुरस्कार पूनम वानखडे हिने प्राप्त केला. लोकगीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार अमरावती येथील ऋतुजा, द्वितीय पुरस्कार पवन तर तृतीय पुरस्कार कामाक्षी, सर्वेश व नेहा यांनी संयुक्तपणे प्राप्त केला.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर