लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेवर सातत्याने टीका होत आहे. आता पावसाळ्यात जि.प.च्या १६३ शाळांना गळकी लागली आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना अध्ययन करावे लागत आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. काही शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. एकीकडे डिजिटलच्या नावावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. डिजिटल करीत असताना २५० वर शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. १६३ शाळांना गळकी लागल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती आणि छतांची पोलखोल केली. जिल्ह्यातील १६३ शाळांमधील छत गळत असल्याची नोंद आहे. यात सर्वाधिक शाळा रामटेक तालुक्यातील आहे. अतिवृष्टीमुळे नरखेड तालुक्यातील एका शाळेची सुरक्षा भिंत आणि उमरेडमधील एका शाळेचे स्वच्छतागृह पडले आहे. या शाळेतील छतांच्या तसेच स्वच्छतागृह आणि सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी ९३ लाख २२ हजारांचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे.
नागपूर जिल्हा परिषदेतील १६३ शाळांच्या इमारती गळक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:01 AM
एकीकडे डिजिटलच्या नावावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. डिजिटल करीत असताना २५० वर शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. १६३ शाळांना गळकी लागल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचा दुरुस्तीसाठी ९२ लाखाचा प्रस्ताव