लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:मानवी जीवनाशी संबंध ‘असणाऱ्या आरोग्य आणि तंदुरुस्ती यांची अनेकदा गफलत केली जाते. प्रत्येकाने क्षमता लक्षात घेतल्यास निरोगी व आनंददायी जीवनाचा उपभोग घेता येतो. आरोग्यदायी व तंदुरुस्त राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे रनिंग (धावणे) गेल्या काही वर्षांत महत्त्वाची बाब म्हणजे वैयक्तिक आरोग्याबाबत वाढलेली जागृती. मात्र पुरेशी माहिती न मिळवता मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यास आपणास अपेक्षित आनंद मिळू शकत नाही.रनिंगशी संबंधित महत्त्वाचे घटक१) हृदय व फुफ्फुसाशी संबंधित तंदुरुस्ती.२) स्नायू व अस्थीविषयक तंदुरुस्ती.३) आहार व जल संतुलन.४) विश्रांती व व्यायामोत्तर.१) हृदय व फुफ्फुसाशी संबंधित तंदुरुस्तीएखादी व्यक्ती ज्यावेळी धावते त्यावेळी शरीरातील विविध अवयवातील चयापचयनाची प्रक्रिया वाढते. त्यामुळे विविध अवयवांना ऊर्जा पुरविताना त्या प्रमाणात वाढीव रक्त पुरवठा करावा लागतो. परिणामी हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. अशावेळी हृदयाचे ठोके पर्याप्त नसतील तर व्यक्ती थकते. म्हणून पळताना हृदयावर जास्त ताण येऊ न देता कम्फर्ट हार्ट रेट झोनमध्ये धावणे महत्त्वाचे. ही अवस्था ओळखण्यासाठी नाडीचे ठोके मोजणे आवश्यक असते. त्यासाठी (२३0 व्यक्तीचे वय)गुणिले २/३ हे सूत्र वापरले की जी संख्या येते तेवढी जर नाडी असेल तर व्यक्तीला पळताना थकवा जाणवत नाही. उदा. (२३0-४0) ७ २/३ = १९0 ७ २/३ = ३८0/३ = १२७ (सुमारे) ४0 वर्षीय व्यक्तीने धावताना नाडीचा वेग प्रति मिनीट १२५ ते १३0 दरम्यान ठेवल्यास ती खूप चांगल्याप्रकारे धावू शकते विश्रांतीच्या स्थितीमध्ये व्यक्तीच्या नाडीचा प्रति मिनीट वेग जसा ६0 ते ८0 दरम्यान असतो, त्याचप्रमाणात श्वासाचा वेग २0 ते २५ असतो, धावताना मात्र हे प्रमाण ४0 ते ५0 पर्यंत जाते. हा वेग धावण्याच्या वेगाच्या सम प्रमाणात वाढतो. त्यामुळे नाडी - श्वसन वेगात व्यक्तीने संतुलन ठेवल्यास धाप लागत नाही. म्हणूनच व्यक्तीच्या हृदयाची व फुफ्फुसाची तंदुरुस्ती ही धावण्यामुळे योग्य स्थितीत ठेवण्यास चालना मिळते. मात्र त्यासाठी योग्य पद्धतीने धावणे महत्त्वाचे असते.स्नायू व अस्थीविषयक तंदुरुस्तीपळताना व्यक्तीचे स्नायू, कूर्चा आणि सांध्यांच्या अस्थीवर ताण येतो. विशेषत: पायांचे स्नायू पोटाचे व पाठीचे स्नायू छातीचे व पाठीचे स्नायू यांची भूमिका महत्त्वाची असते. पाय उचलणे व ढांग टाकणे हे जर लयबद्ध असेल तर व्यक्तीला वजन जास्त असूनही दुखापत न होता धावायला जमते. वजनाचा त्याच्या शरीराच्या विविध भागांवर जितका भार पडतो, त्यानुसार व्यक्तीच्या रनिंगचा परफॉर्मन्स निश्चित होतो. धावताना पोटाच्या स्नायूचा वापर करण्यावर भर दिल्यास प्रत्येक स्टेपमागे पायावर पडणारा दाब कमी होतो व वेग वाढतो.व्यक्तीच्या वजनाचा भार हा पायाच्या सांध्यावर किंवा गुडघ्यावर पडतो, तो अनुक्रमे ३0 ते ४0 टक्के असतो. उर्वरित वजनाचा भार माकड हाडावर पडतो. जर पळताना व्यक्तीस वजनाच्या फक्त १५ टक्के वजन पायावर, १५ टक्के गुडघ्यांवर आणि ५0 टक्के वजन हीप जॉइन्टवर व उर्वरित २0 टक्के खांद्यांवर देण्याचे कौशल्य आत्मसात करता आले तर वजन जास्त असले तरी वेगात पळणे शक्य होते. अर्थात यासाठी तशाप्रकारे सरावावर भर देऊन कौशल्य विकसित करणे आवश्यक असते. त्यामुळेजास्त वजनाच्या व्यक्तीला पळताना दुखापत होते हे काही खरे नाही.
जाणून घ्या, मॅरेथॉन रनिंगचे तंत्र व मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:54 AM
मानवी जीवनाशी संबंध ‘असणाऱ्या आरोग्य आणि तंदुरुस्ती यांची अनेकदा गफलत केली जाते. प्रत्येकाने क्षमता लक्षात घेतल्यास निरोगी व आनंददायी जीवनाचा उपभोग घेता येतो.
ठळक मुद्देनागपूर लोकमत महामॅरेथॉन २०१८