लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्रद्धाभावाने हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेले ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते रूपकुमार तुलसीदास टहिल्यानी (६४) यांचे बुधवारी हनुमानाच्या चरणातच निधन झाले. विशेष म्हणजे, ते नेहमी आपल्या दिनचर्येची सुरुवात हनुमानाच्या दर्शनानेच करायचे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, टहिल्यानी सीपी क्लबजवळील हनुमान मंदिरात दर्शनाला गेले होते. हनुमानाच्या चरणी डोके टेकवताच त्यांचे निधन झाले. राजनगर, सीताराम मंदिराच्या मागे राहणारे व सुनील स्कूटर्सचे संचालक रूपकुमार (रूप) टहिल्यानी हे आॅटोमोबाईल डीलर असोसिएशनचे संरक्षक होते. ते रोटरी क्लब, सीपी क्लबसह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांशी जुळलेले होते. समाजसेवेत त्यांनी मोठे योगदान दिले होते. ते खूप धार्मिक स्वभावाचे होते. धार्मिक व सामाजिक कार्यासाठी दानदाते म्हणून शहरात त्यांची विशेष ओळख होती. गुरुवार २२ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता नारा घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.
नागपुरात हनुमानाच्या चरणात त्यागले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:57 AM
श्रद्धाभावाने हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेले ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते रूपकुमार तुलसीदास टहिल्यानी (६४) यांचे बुधवारी हनुमानाच्या चरणातच निधन झाले.
ठळक मुद्देजेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रूपकुमार टहिल्यानी यांचे निधन