काम करायचे नसेल तर पद सोडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:07 PM2018-05-15T23:07:13+5:302018-05-15T23:52:02+5:30

शहर काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील, प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रसंगी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे. ज्यांना पक्षात सक्रिय रहायचे असेल त्यांनीच पदावर रहावे. जे काम करण्यास इच्छुक नसतील त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. त्यांच्याजागी दुसऱ्या इच्छुक व्यक्तीला संधी दिली जाईल, अशा शब्दात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

Leave the job if you do not want to work | काम करायचे नसेल तर पद सोडा 

काम करायचे नसेल तर पद सोडा 

googlenewsNext
ठळक मुद्देविकास ठाकरे यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान : शहर काँग्रेस कार्यकारिणी बैठक


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील, प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रसंगी नागरिकांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे. ज्यांना पक्षात सक्रिय रहायचे असेल त्यांनीच पदावर रहावे. जे काम करण्यास इच्छुक नसतील त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. त्यांच्याजागी दुसऱ्या इच्छुक व्यक्तीला संधी दिली जाईल, अशा शब्दात काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
शहर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक मंगळवारी देवडिया काँग्रेस भवनात पार पडली. कही पदाधिकारी शहर काँग्रेसच्या बैठकीकडे, पक्षाच्या आंदोलनांकडे सातत्याने पाठ फिरवतात. त्यांच्यावर ठाकरे यांचा रोख होता. ठाकरे म्हणाले, काही लोकांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट मागण्यासाठी देवडियात रांगा लावल्या. आता ते आपल्या प्रभागात फिरतानाही दिसत नाहीत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे पक्ष कमजोर होत आहे. ब्लॉक अध्यक्षांनी आपली जबाबदारी नीटपणे पार पाडावी. बुथ कमेटी,ब्लॉक कमेटीच्या प्रभागानुसार बैठका घ्याव्या व त्याचा अहवाल शहर काँग्रेस कमिटीकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. महापालिकेच्या सभागृहात पाणी समस्येसह इतरही प्रश्न मांडले जातात. मात्र, प्रशासन आमच्या प्रश्नाकडे हेतुपूरस्सर दुर्लक्ष करते, असा आरोप बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी केला. यावर विकास ठाकरे यांनी शहर काँग्रेस नगरसेवकांच्या पाठीशी राहील, असा विश्वास दिला.
बैठकीत संजय महाकाळकर, उमाकांत अग्निहोत्री, संदीप सहारे, हरीश ग्वालबंसी, प्रा. दिनेश बानाबाकोडे, सरचिटणीस जयंत लुटे, प्रशांत धवड, रमेश पुणेकर, गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, संदेश सिंगलकर, अ‍ॅड. अशोक यावले, राजेश कुंभलकर, नलिनी करागळे, निर्मला बोरकर,पंकज निघोट, रेखा बारहाते,भारती कांबळे, अतिक मलीक, अशोक निखाडे, प्रवीण गवरे, महेश श्रीवास,युवराज लांडे, राजेश पौनीकर,आशुतोष कांबळे, शुभांगी चित्तलवार, प्रवीण आगरे,धरम पाटील,अण्णाजी राऊत, ईश्वर बरडे, हरी नायक, अरविंद वानखेडे,किरण गडकरी,निर्मला बोरकर,प्रकाश बांते, विलास वाघ, अनिल पोरटकर, रवी गाडगे, राकेश पन्नासे, सूरज आवळे, विजया चिटमिटवार, अनिल लारोकर, सुनिता ढोले, हरी यादव आदी उपस्थित होते.
तीन बैठकींना अनुपस्थित राहिल्यास पदमुक्त
शहर काँग्रेसच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहणे ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. व्यक्तिगत अडचणीमुळे कुणाला बैठकीला येणे शक्य नसेल तर तसे कार्यालयाला कळवावे. मात्र, कुणी सलग तीन बैठकांना अकारण अनुपस्थित राहत असेल तर संबंधित व्यक्तीला पदमुक्त केले जाईल, असा इशाराही ठाकरे यांनी बैठकीत दिला.
१७ मे रोजी आयुक्तांचा घेराव
 शहरातील जनतेला पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. शहरात चार कंत्राटदारांमार्फत करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. पथदिव्यांच्या कामाचे टेंडर ७० टक्के जास्त दराने दिले गेले आहे. या सर्व प्रश्नांवर महापालिका आयुक्तांचा १७ मे रोजी काँग्रेसतर्फे घेराव केला जाईल, अशी घोषणा विकास ठाकरे यांनी बैठकीत केली.

Web Title: Leave the job if you do not want to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.