नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) च्या लेडीज इंटरप्रेन्यूअर्स विंग (एलईडब्ल्यू) ची २०२१-२२ वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात पूनम लाला अध्यक्ष, रश्मी कुळकर्णी सचिव, इंदू क्षीरसागर उपाध्यक्ष व शिखा खरे, योगिता देशमुख कोषाध्यक्ष, पूनम गुप्ता (जनसंपर्क प्रमुख), सानिया रामचंदानी यांना सदस्य म्हणून निवडण्यात आले. सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये सरला कामदार, प्रफुल्लता रोडे, मधुबाला सिंह, सरिता पवार, माजी अध्यक्ष मनीषा बावनकर, सईदा हक, चित्रा पराते, वाय. रमानी, नीलम बोवाडे, अंजली गुप्ता, अनिता राव, वंदना शर्मा, साची मलीक, रिता लांजेवार यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणी गठित करताना एलईडब्ल्यूचे संयोजक सुरेश अग्रवाल व व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी माजी अध्यक्ष मनीषा बावनकर यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांचा सत्कार केला व नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. दरम्यान लर्निंग अॅण्ड डेव्हलपमेंट एक्सपर्ट भास्करभट्ट भरनीराम यांचे ‘कस्टमर सेंट्रीक’ या व्यावसायिक विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्र पार पडले. या वेळी व्हीआयएचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुधे व आदित्य सराफ, सदस्य असित सिन्हा, गिरीश देवधर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन रिता लांजेवार व वाय. रमानी यांनी केले. आभार रश्मी कुळकर्णी यांनी मानले.
व्हीआयए एलईडब्ल्यू नवीन महिला कार्यकारिणी गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:07 AM