शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

रणभूमीतील दिग्गज ; जतिराम बर्वेंचा एक विक्रम असाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:15 PM

रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे.

ठळक मुद्देराज्यात पहिल्या तर देशात दुसऱ्या मताधिक्याचे विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे. १९८० मध्ये अशीच एक ऐतिहासिक नोंद या मतदारसंघात झाली. ती म्हणजे राज्यात सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येण्याची. हा विक्रम केला आहे काँग्रेसचे जतिराम बर्वे यांनी.१९७७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर संसदेत पोहोचणाऱ्या बर्वे यांना कॉँग्रेसने पुन्हा एकदा १९८० मध्ये रामटेकच्या रणभूमीत उतरविले. तेव्हा त्यांच्याविरोधात जनता पार्टीचे राजेंद्रबाबू देशमुख, जनता पार्टी (एस)चे पुरुषोत्तम राऊत, काँग्रेस (अर्स)चे चंद्रकांत राऊत यांच्यासह अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाकरराव तिडके, देवराव मेश्राम, रामकृष्ण दाणी, कोठीराम गजभिये, काशिनाथ कराडे हे उमेदवार रिंगणात होते. त्यात जतिराम बर्वे यांनी २ लाख ७३ हजार ९५७ मते घेत राजेंद्रबाबू देशमुख यांचा २ लाख १४ हजार ७६३ मतांच्या फरकाने पराभव केला. त्यावेळी देशमुख यांना ५९ हजार १९४ मतांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा मान बर्वे यांना जातो. १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधी देशात सर्वाधिक जास्त मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी रायबरेली (उत्तर प्रदेश) आणि मेडक (आंध्र प्रदेश) अशा दोन लोकसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. यातील मेडक या मतदारसंघातून त्यांनी २ लाख १९ हजार १२४ मतांच्या फरकाने जनता पार्टीच्या एस. जयपाल रेड्डी यांचा पराभव केला. इंदिरा गांधी यांना ३ लाख १ हजार ५७७ तर रेड्डी यांना ८२ हजार ४५३ मते मिळाली होती. रायबरेलीत त्यांना २ लाख २३ हजार ९०३ मते मिळाली. त्यांच्याविरोधातील जनता पार्टीच्या विजया राजे सिंधीया यांनी ५० हजार २४९ मते घेतली. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून मात्र त्या केवळ १ लाख ७३ हजार ६५४ मतांनी विजयी झाल्या.१९८० च्या निवडणुकीत देशात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्याने विजयी होण्याचा मान इंदिरा गांधी यांना तर महाराष्ट्रातून पहिल्या आणि देशातून दुसºया क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होण्याचा मान हा रामटेक लोकसभा क्षेत्रातून विजयी झालेल्या जतिराम बर्वे यांच्या नावाने आहे.असे असले तरी यापूर्वीचा रामटेक लोकसभा क्षेत्राचा १९७१ च्या निवडणुकीतील विक्रम मात्र जतिराम बर्वे हे मोडू शकले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे अमृत सोनार हे २ लाख ३१ हजार ७४२ मतांनी विजयी झले होते.सोनार यांना २ लाख ८० हजार ५४ तर फॉरवर्ड ब्लॉकचे आनंदराव कळमकर यांनी ४८ हजार ३१२ मते पडली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक