शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

काँग्रेससाठी विधानसभेची वाट कठीण

By admin | Published: March 23, 2017 2:05 AM

महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसची विधानसभेची वाटही अधिक कठीण झाली आहे.

एकाही विधानसभेत नाही मताधिक्य : मनपा पराभवाने घसरला ग्राफ कमलेश वानखेडे   नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसची विधानसभेची वाटही अधिक कठीण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने शहरातील सहाही जागा मोठ्या फरकाने गमावल्या. महापालिका निवडणुकीत काहीसे कमबॅक होईल व याचा फायदा विधानसभेत होईल, अशी काँग्रेस नेत्यांना अपेक्षा होती. मात्र, यावेळीही काँग्रेसचे फासे उलटेच पडले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नागपुरात खाते उघडण्यासाठी काँग्रेसला खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. महापालिका निवडणुकीत मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता भाजपाला विधानसभा मतदारसंघात किमान २५ ते ५० हजारांपर्यंतचे मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांची आकडेवारी पाहता पूर्व व दक्षिण-पश्चिम नागपूर हे दोन मतदारसंघ भाजपचा गड म्हणून नावारुपास आले आहेत. गेल्या निवडणुकीत तर दक्षिण नागपूरने भाजपला एकतर्फी झुकते माप दिले. भाजपचे आ. सुधाकर कोहळे हे तब्बल ४३ हजार २१४ मतांनी विजयी झाले होते. महापालिका निवडणुकीचा विचार करता भाजपचे सर्वाधिक २२ नगरसेवक पूर्व नागपुरातून विजयी झाले आहेत. नगरसेवकांना मिळालेले मताधिक्य आ. कृष्णा खोपडे यांना सुखावणारे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण- पश्चिम मतदारसंघातही भाजपाचे तब्बल २१ नगरसेवक विजयी झाले आहेत.