- कमलेश वानखेडेनागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकारने संपूर्ण कामकाजही उरकले.विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत चर्चेची मागणी केली. ती नाकारून विधानसभाध्यक्षांनी कामकाज पुकारताच विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. त्यांनी कर्जमाफी फसवी असून दीड हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवला. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीमुख्यमंत्र्यांनी तुमच्या सरकारने कर्जमाफीत संपूर्ण विदर्भाला जेवढी रक्कम दिली नाही तेवढी आम्ही एकट्या बुलडाणा जिल्ह्याला दिली आहे. तुम्ही सिंचन व कर्जाची व्यवस्था केली नाही म्हणून आज शेतकºयांवर ही वेळ आली आहे, असे सुनावले.शेवटच्या पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना सुरू राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तरीही विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती.‘नौटंकी’वरून ‘ड्रामा’विधान परिषदेत हिवाळी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शेतकºयांच्या बाबतीत ‘नौटंकी’ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. याला सत्ताधाºयांनी आक्रमक स्वरूपात प्रत्युत्तर दिले. त्यामुळे अगोदर चार वेळा व नंतर दिवसभरासाठी सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘नौटंकी’ या शब्दावर आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला. विरोधकांच्या राजकारणाची पातळी खालावली आहे, असा आरोप पाटील यांनी केला. त्यामुळे विरोधक संतप्त झाले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चार वेळेला तहकूब करावे लागले. सदर शब्द तपासून घेऊ, असे आश्वासन सभापतींनी दिले.बोंडअळी नुकसानीची मदत देणारराष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना बोंडअळीमुळे नुकसान झालेले कापसाचे बोंड भेट म्हणून दिले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असून, नुकसानग्रस्तांना विम्याद्वारे, केंद्राच्या ‘एनडीआरएफ’ निधीतून मदत केली जाईल.स्टॅम्प पेपरवर लिहून देतो !विखे पाटील यांनी १०० रुपयांचा कोरा स्टॅम्प पेपर दाखवीत यावर ४१ लाख शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याचे लिहून देण्याचे आव्हान दिले. यावर मुख्यमंत्री म्हणाले की एक हजारांच्या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिल्याचे लिहून देण्यास तयार आहोत.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : विरोधकांवरच ‘हल्लाबोल’, पहिल्या दिवशी सत्ताधारीच आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:55 AM