लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेंच टायगर रिझर्व्हच्या नागलवाडी रेंजमध्ये शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तीन ते चार वर्षाचे बिबट मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली.बीट गार्ड, वनमजुर आणि गस्त घालणाऱ्या पथकाला झुडुपात बिबट मृतावस्थेत आढळून आले. लगेच त्यांनी याची सूचना वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळाशेजारील परिसर ताब्यात घेण्यात आला. परिसराची बारकाईने पाहणी केली, परंतु काहीच संशयास्पद आढळले नाही. घटनेची माहिती मिळताच पेंचचे उपसंचालक आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृत बिबट्याच्या शरीराची पाहणी केली असता शरीरावर कोणतीही जखम आढळली नाही. त्यानंतर डॉ. सुबोध नंदागवळी, डॉ. अंकुश दुबे, डॉ. सय्यद बिलाल यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात मृत बिबट्याच्या गळ्यावर गंभीर जखमा आणि रक्तस्राव झाल्याचे दिसले. मोठ्या आणि शक्तिशाली प्राण्याची शिकार केल्यामुळे या जखमा झाल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.
पेंच टायगर रिझर्व्हमध्ये बिबट मृतावस्थेत आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:22 AM
पेंच टायगर रिझर्व्हच्या नागलवाडी रेंजमध्ये शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता तीन ते चार वर्षाचे बिबट मृतावस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली.
ठळक मुद्देगळ्यावर आढळल्या जखमा : मोठी शिकार केल्याचा अंदाज