लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रामटेक वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवलावार-पवनी रस्त्यावर एका जखमी मादी बिबट्यास वन अधिकाऱ्यांच्या चमूने पकडले. हा बिबट शनिवारी पहाटे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता.वन अधिकाऱ्यानुसार त्याचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे आहे. जखमी झाल्यानंतर बिबट रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आलेल्या नालीत पडला होता. परंतु तो शुद्धीत होता. त्याचा आवाज ऐकून रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी स्थानिक वन अधिकाऱ्यांना सूचना दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी मादा बिबटची प्रकृती गंभीर असल्याने नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित केले. सकाळी ९.३० वाता सेमिनरी हिल्स येथील रेस्क्यू टीमला घटनास्थळी रवाना करण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ पूर्णपणे सील केले. यानंतर नालीमध्येच औषधाचे इंजेक्शन मारून बिबट्यास बेशुद्ध केले आणि जाळीत पकडण्यात आले.या रेस्क्यू आॅपरेशनदरम्यान मोठ्या संख्येने नागरिक व रस्त्याने ये-जा करणाऱ्यांनी गर्दी केली. जखमी बिबट्यास नागपूरच्या अलंकार टॉकीजजवळच्या व्हेटरनरी रुग्णालयात आणून एक्स-रे काढण्यात आला. त्यात त्याच्या छातीवर मार असल्याचे आढळून आले. यानंतर उपचारासाठी त्याला गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आले. परंतु काही अधिकारी व वन्यजीवप्रेमी बिबट्याचा उपचार सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये करण्यासाठी आग्रही होते.एसीएफने नागरिकास मारलेस्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्क्यू आॅपरेशननंतर बिबट्यास पिंजऱ्यात टाकून नागपूरकडे रवाना करीत असताना पाहणाऱ्यांची गर्दी जमली. बिबट्याला पाहण्यासाठी एक व्यक्ती वन अधिकाऱ्याशी वाद घालू लागला. तेव्हा संतापून एसीएफ बोराडे यांनी त्याला मारल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:46 PM
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रामटेक वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवलावार-पवनी रस्त्यावर एका जखमी मादी बिबट्यास वन अधिकाऱ्यांच्या चमूने पकडले. हा बिबट शनिवारी पहाटे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला होता.
ठळक मुद्देदेवलापार-पवनी रस्त्यावरील घटना