लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिल्लीमार्फत नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या इक्वीसिटी प्रकल्पांतर्गत मनपातील वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात समानता, विविधता आणि सामाजिक सहभाग या विषयावर अधिकाऱ्यांना तज्ज्ञामार्फत संवेदनशीलतेचे धडे देण्यात आले.कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या तर दुसऱ्या सत्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा उपस्थित होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात वर्ग १ व वर्ग २च्या ९० अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.कार्यशाळेमध्ये सामाजिक व आर्थिक सल्लागार डॉ. कपिल चंद्रायण, कायद्यातील तज्ज्ञ डॉ. पदमा चांदेकर, प्रकृती महिला व विकास संसाधन केंद्राच्या कार्यकारी संचालिका सुवर्णा दामले, वरदान इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन आॅफ अॅडाप्शन अँड चाईल्ड वेलफेअरच्या कार्यकारी संचालिका व बाल संरक्षण आयोग व भारतीय स्त्री शक्तीच्या सदस्या अॅड. वासंती देशपांडे आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी तर संचालन शेखर गिरडकर यांनी केले.
नागपूर मनपातील अधिकाऱ्यांना संवेदनशीलतेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:55 AM
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिल्लीमार्फत नागपूर महापालिकेमध्ये सुरू असलेल्या इक्वीसिटी प्रकल्पांतर्गत मनपातील वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
ठळक मुद्देदोन दिवसीय कार्यशाळासमानता, विविधता आणि सामाजिक सहभाग विषयांचा समावेश