शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

मागे लागलेल्या गुंडाला महिलेने शिकविला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:10 AM

महिलेसोबत सलगी साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गुंडाला त्याच्या मित्रासह पळवून नेऊन महिलेच्या साथीदारांना या दोघांची बेदम धुलाई केली. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास मनीषनगरात ही घटना घडली.

ठळक मुद्देभेटायला बोलवून केली बेदम धुलाई : बेलतरोडीत गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलेसोबत सलगी साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गुंडाला त्याच्या मित्रासह पळवून नेऊन महिलेच्या साथीदारांना या दोघांची बेदम धुलाई केली. गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास मनीषनगरात ही घटना घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्याचे नाव हिमांशू चंद्रकार (वय २३, रा. त्रिमूर्तीनगर) आहे तर त्याचा मित्र धीरज दयाशंकर बघेल (वय २१, रा. लोखंडेनगर) जुजबी जखमी झाला.कुख्यात गुंड बादल शंभरकर याची गेल्या वर्षी हत्या झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादलसोबत अपूर्वा नागपूरकर (वय २४, रा. जयताळा) ही पत्नी म्हणून राहत होती. त्यावेळी हिमांशू चंद्रकार हा देखील बादलसोबत अनेक गुन्ह्यात सहभागी होता. बादलची हत्या झाल्यानंतर हिमांशू याने अपूर्वाशी सलगी साधण्याचे आटोकाट प्रयत्न चालविले. ती त्याला दाद देत नव्हती. काही दिवसांपूर्वी हिमांशू चंद्रकारला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करून कारागृहात डांबले. दोन दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आणि त्याने अपूर्वाला भेटण्याचा हट्ट धरला. तो ऐकत नसल्याचे पाहून अपूर्वाने त्याला गुरुवारी रात्री मनीषनगरातील ताजश्री शोरूमच्या मागच्या गल्लीत बोलविले. त्यानुसार हिमांशू चंद्रकार आणि धीरज बघेल तेथे पोहचले. तेथे अपूर्वा नागपूरकर आणि तिचा भाऊ उभा होता. हिमांशू धीरजला दुचाकीजवळ ठेवून अपूर्वाजवळ गेला. तो तिच्यासोबत २० ते २५ मिनिटे बोलत उभा राहिला. त्यानंतर अचानक अपूर्वाचे सहा साथीदार लाठ्या काठ्या घेऊन आले. त्यांनी हिमांशूला बेदम मारहाण केली. ते पाहून धीरज त्याला वाचविण्यासाठी गेला असता दोघांनी धीरजला पकडून ठेवले. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी जमली असता आरोपींनी एका दुचाकीवर धीरजला तर दुसऱ्या दुचाकीवर हिमांशूला जबरदस्तीने बसविले आणि जयंतीनगरी-२ जवळच्या निरंजन नगरात नेले. तेथे त्यांनी हिमांशूला गंभीर दुखापत केली तर, धीरजला धमकी देऊन जखमी अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले. धीरजने कंट्रोल रुमच्या माध्यमातून बेलतरोडी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी हिमांशू चंद्रकारला मेडिकलमध्ये दाखल केले. धीरजच्या तक्रारीवरून हवलदार कृष्णा काळमेघ यांनी अपूर्वा व तिच्या साथीदारांविरुद्ध अपहरण तसेच गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी पोलिसांनी अपूर्वासह तिघांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर