शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सत्ता कुणाचीही येऊ दे, आठवलेंची जागा पक्की!; नितीन गडकरी यांची मिश्कील टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:38 AM

केंद्रात चौथ्यांदा आमचे सरकार येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे.

केंद्रात चौथ्यांदा आमचे सरकार येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. आमची सत्ता येईल की नाही माहिती नाही; पण सत्ता कुणाचीही आली तरी आठवले यांची जागा पक्की आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मारवाडी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा २०२४ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मोदींकडे आहे सत्तेत येण्याचे तंत्र : आठवले

रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत येण्याचे तंत्र माहिती असल्याने आम्ही चौथ्यांदा सरकार बनवू, केवळ आपला समाज नाही तर सगळा समाज, देश जोडला पाहिजे, ही बाबासाहेबांची भावना होती व त्यानुसारच मी काम करीत असल्याचे ते म्हणाले.

एकत्रीकरण करण्याच्या नावाने रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आजही एकत्र येण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNitin Gadkariनितीन गडकरी