लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी वर्तनात सुधारणा न केल्यास विभागप्रमुखांनी याची माहिती द्यावी. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी बुधवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला.उपस्थित अधिकाऱ्यांना कर्र्मचारी उशिरा येत असल्याबाबत धारेवर धरले. बायोमेट्रिक मशीन लावल्यानंतरही अनेक कर्मचारी पंचिंग केल्यानंतर दुपारी कार्यालयात उपस्थित नसतात. त्यानंतर सायंकाळी पंचिंग करून घरी जातात. कर्मचारी उपस्थित राहत नसल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कार्यालयात येण्याची वेळ सकाळी १० वाजताची असताना, अनेक कर्मचारी १०.१५ ते १०.३० पर्यंत कार्यालयात येतात. सायंकाळी ५.४५ ला पंचिंग करून घरी जातात. कार्यालयीन वेळेत कर्मचारी कार्यालयात उपस्थित असणे आवश्यक आहे.जे कर्मचारी वा अधिकारी कार्यालयीन कामानिमित्ताने बाहेर फिल्डवर आहेत, त्यांनी हलचल रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. यासाठी रजिस्टर ठेवून त्यांनी नोंदी ठेवा; अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.नाव, पद व जबाबदारीच्या पाट्या लागल्याकार्यालयातील कर्मचाऱ्यांचे नाव, पद व जबाबदारी याची माहिती असलेल्या पाट्या कर्मचाऱ्यांच्या टेबलवर लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली.फाईल तातडीने निकाली काढाकर्मचारी व अधिकाऱ्यांच्या टेबलवर फाईल प्रलंबित नसावी. फाईल मंजुरीसाठी आल्यानंतर ती ठरलेल्या कालावधीत निकाली काढली पाहिजे. कुणाच्याही टेबलवर फाईल पडून राहिल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल,असा इशाराही आयुक्तांनी दिला.भटकंतीला लागणार चापमहापालिका मुख्यालयात कर्मचारी व अधिकारी टेबलवर मिळत नाही.त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्यांना चकरा माराव्या लागतात.शहराच्या लांब भागातील येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना यामुळे हकनाक त्रास होतो. आयुक्तांच्या निर्देशामुळे कर्मचाऱ्यांच्या भटकंतीला चाप लागणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
नागपुरात लेटलतिफीला विभागप्रमुख जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:51 AM
महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी व लेटलतिफीची आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी गंभीर दखल घेतली आहे. कर्मचारी कार्यालयात उशिरा आल्यास यासाठी विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल. यासाठी विभागप्रमुखांना आपल्या विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी वर्तनात सुधारणा न केल्यास विभागप्रमुखांनी याची माहिती द्यावी. अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचा इशारा आयुक्तांनी बुधवारी विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला.
ठळक मुद्देमनपा आयुक्तांची तंबी : हलचल रजिस्टर ठेवण्याचे निर्देश