शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

चला साजरे करू या ‘इको बाप्पा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 7:00 AM

यंदाच्या श्रीगणेशोत्सवाला ‘इको फ्रेण्डली’ स्पर्श देण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी संस्था, संघटना करत आहेत आणि त्याच हेतूने गर्दीत जाणे टाळणे, संसर्गाचा धोका परतविण्यासाठी ‘इको बाप्पा’ची संकल्पना पुढे येऊ लागली आहे.

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरणाचा समतोल, संसर्गाचा धोका आणि बरेच संकट ओढवल्याच्या काळात सर्व विघ्न दूर करणाऱ्या बाप्पाचा उत्सवही निर्विघ्न पार पडावा, अशी मनोमन भावना भक्तांची आहे. काळच असा आला आहे की उत्सवाचा जल्लोष करता येणार नाही. मात्र, त्यामुळे भक्तांचा उत्साह कमी होईल असेही नाही. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या श्रीगणेशोत्सवाला ‘इको फ्रेण्डली’ स्पर्श देण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी संस्था, संघटना करत आहेत आणि त्याच हेतूने गर्दीत जाणे टाळणे, संसर्गाचा धोका परतविण्यासाठी ‘इको बाप्पा’ची संकल्पना पुढे येऊ लागली आहे.गेल्या काही वर्षांपासून शेणापासून, तणसापासून ते आरोग्यदायी बीजांचे रोपण असलेल्या गणपती मूर्तीपर्यंत ही संकल्पना हळूहळू रुढ व्हायला लागली आहे. मात्र, यावर्षी कोरोनाचा संसर्ग हे सर्वात मोठे संकट आहे. अशात भक्तांनी घराबाहेर पडून, बाजारात जाऊन ‘कोरोना कॅरिअर’ बनू नये तर घरीच राहून ‘कोरोना वॉरिअर’ बनावे, असे आवाहन केले जात आहे. शिवाय, यंदा बाप्पाच्या मूर्तींचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोना रुग्ण असल्याने अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तेव्हा घरच्या घरीच सोप्या पद्धतीने मूर्ती कशा बनवायच्या किंवा पर्यावरणपूरक अनुष्ठान कसे पार पाडायचे, असे आवाहन केले जात आहे.बाप्पाच्या अनेक विधाप्रत्येकाच्या देवघरात बाप्पा विराजमान आहेत. मात्र, श्रीगणेशोत्सवात पार्थिव अर्थात विसर्जन करावयाच्या मूर्तींचे पूजन केले जाते. अशात कोरोना सीलचा ठप्पा लागलेल्या परिसरातील नागरिकांपुढे मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे भक्त घरातल्या तुळशीजवळची माती घेऊन जशी जमेल तशी मूर्ती कोरून बाप्पा बनवून अनुष्ठानासाठी वापरता येऊ शकते. कणाकणात शिवतत्त्व आहे आणि बाप्पाचा वास सर्वत्र आहे. म्हणून नाहीच बनवता आली मूर्ती तर श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना करतानाच मातीचा गोळा बनवून तोच बाप्पा म्हणून बसवता येईल. शिवाय, हळदीचा, सुपारीचा, मैद्याचा, कणकीच्या पिठाचा, डाळीचा वापर करूनही बाप्पा जसा जमेल तसा किंवा गोल गोळाच बाप्पा म्हणून स्थापित करता येऊ शकतो. भाज्या व फळांचा वापर करूनही बाप्पा बसवता येऊ शकतो.निर्माल्याचे पावित्र्य पसरेल घरोघरीहार, फुले, दुर्वा, बेल अशा अनेक प्रकारच्या वस्तू वाहून झाल्यावर फेकल्या जातात किंवा तलावात विसर्जित केल्या जातात. त्यापेक्षा या निर्माल्याचा उपयोग करून बागेतील झाडांसाठी नायट्रोजन व कार्बनयुक्त खत तयार करता येते. श्रीगणेशोत्सवाच्या दहा दिवसात ही सवय लागेल आणि विसर्जनानंतर घरच्या घरी खत तयार झालेले असेल.बाप्पा खºया अर्थाने पर्यावरणाची देवता आहे. निसर्गावर आलेले विघ्न दूर करण्याची जबाबदारी आपली आहे. कोरोनाच्या काळात भक्तांनी स्वत:वरील संकट दूर करण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क आणि गर्दी टाळण्यासाठी हे उपाय केले तर संरक्षण आपलेच होणार आहे. यासाठी अनेक संस्था युट्यूब व सोशल माध्यमांवर व्हिडिओ आणि माहिती शेअर करत आहेत. त्याचा लाभ घ्यावा.- रोहन अरासपुरे, संस्थापक अध्यक्ष, दि ड्रीम फॉर लाईफ फाऊंडेशन 

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव