शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चला करू या विज्ञानाशी मैत्री : अपूर्व विज्ञान मेळाव्याने झाले सहज सोपे विज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:17 AM

ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २० वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर मनपाद्वारे आयोजित या अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना राज्यभरात अंमलबजावणीस आणली आहे.

ठळक मुद्दे२० वर्षांपासून नागपुरातील अपूर्व विज्ञान मेळावा होतोय रंजक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ना प्रयोगशाळा, ना प्रयोगशाळेतील भारीभारी उपकरणे तरी गेल्या २० वर्षांपासून अपूर्व विज्ञान मेळा रंजक विज्ञानाची संकल्पना मांडत आला आहे. महाराष्ट्र शासनाने नागपूर मनपाद्वारे आयोजित या अपूर्व विज्ञान मेळाव्याची संकल्पना राज्यभरात अंमलबजावणीस आणली आहे.

रिफिल, प्लास्टिकच्या बॉटल, सेल, तांब्याची तार, कंचे, चेंडू, ट्रांझिस्टरचे चुंबक, फुगा, आगपेटी, दगड, माती या साहित्यापासून विज्ञानाचे मूलभूत सिद्धांत अपूर्व विज्ञान मेळाव्यातून सहज सोप्या पद्धतीने मांडले आहेत. विज्ञानाच्या बाबतीत येणारे का? आणि कसे? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराची प्रचिती या मेळाव्यातून येते. उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या परिसरात ‘चला करू या विज्ञानाशी मैत्री’ या संकल्पनेतून विज्ञानाची डोकेदुखी सहज सोपी झालेली दिसते आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रयोग महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारले आहे. या प्रदर्शनासाठी दीप्ती बिस्ट, ज्योती मेडपिलवार, पुष्पलता गावंडे, नीलिमा अढाऊ, मनीषा मोगलेवार, वंदना चव्हाण, सुनीता झरबडे, नीता गडेकर मनपाच्या या शिक्षिकांचे सहकार्य लाभले आहे.सूर्य चंद्र एका आकाराचे का दिसतात 
पृथ्वीवरून सूर्य आणि चंद्र एकाच आकाराचे का दिसतात, हे दाखविण्यासाठी अमरेश कुशवाह या विद्यार्थ्याने तीन चेंडू एक हार्डबोर्डचा वापर केला आहे. यातून अतिशय रंजक पद्धतीने सूर्य चंद्र आणि पृथ्वीतील अंतर दाखविले आहे.खिळ्यांची ‘कम्फरटेबल’ चेअर 
नेहा पुरी या विद्यार्थिनीने मेळाव्यात ठेवलेली ‘खिळ्यांची’ कम्फरटेबल चेअर’ बघून आश्चर्य वाटण्यासारखेच आहे. खिळा रुतल्यावर त्याची वेदना तुम्ही अनुभवली असेल. अशावेळी शेकडो खिळ्यांवर बसल्यावर काय अवस्था होईल? खुर्ची बघितल्यावर नक्कीच भीती वाटते. पण एकदा त्यावर बसल्यावर खरंच आरामदायक वाटते.खुर्चीवरून उठणे इतके सोपे नाही 
सिद्धी विश्वकर्मा हिने तर साध्या खुर्चीवरून शरीराच्या गुरुत्वकर्षणाचा सिद्धांत मांडला आहे. तिने दावा केला आहे खुर्चीवरून सहज उठून तर दाखवा. बघितल्यावर सर्वांना आश्चर्य वाटते, पण बसल्यावर उठताना सर्वांची दमछाक होते.तांब्याची तार आणि चुंबकातून वीजसुहानी मावकर ह्या विद्यार्थिनीने रिकाम्या सेलोटेपला तांब्याची तार गुंडाळली. त्याला चक्रीच्या आकाराचे चुंबक लावले. चुंबकाच्या तारांना एक छोटा एलएडी लाईट जोडला. चुंबक फिरविले की लाईट लागलो. अगदी खेळाच्या साहित्यासारखा तिचा हा प्रयोग ‘मॅग्नेट पॉवर’ चा सिद्धांत मांडतो.कागदाचा खांब किती मजबूतआसिया परविन या विद्यार्थिनीने ‘प्रेशर फोर्स डिस्ट्रिब्युशन’ हा सिद्धांत मांडताना कागदी खांबावर ४० किलोचे वजन सहज पेलता येते हे दाखवून दिले.बेरीज-वजाबाकी सहज करा 
डॉ. राम मनोहर लोहिया विद्यालयाच्या शिवानी आणि दीपिका यांनी तयार केलेल्या स्केलवर बेरीज-वजाबाकी झटपट सोडविता येते. तेही खेळाच्या माध्यमातून.पाढे तयार करण्याची सोपी पद्धत 
आकाश कुऱ्हाडे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या टेक्निकद्वारे ११ पासून १०० पर्यंतच्या कुठल्याही संख्येचा पाढा सहज तयार करता येतो.छोट्या बरणीत मोठा फुगा बसतोच कसा? 
छोट्याशा बरणीत पाण्याने भरलेला मोठा फुगा जातो कसा? हवेच्या दाबाचा सिद्धांत माडणारा हा प्रयोग विद्यार्थ्यांनी अतिशय रंजकतेने प्रदर्शनात मांडला आहे.कोन से कान मे आवाज आयी 
आफरीन बानू विद्यार्थिनीने ‘कोन से कान में आवाज आयी’ शीर्षकावर तयार केलेला प्रयोग बघणाऱ्यांचे चांगलेच मनोरंजन करतो आहे. या प्रयोगातून ध्वनीचा सिद्धांत तिने मांडला आहे.पाण्यात मेणबत्ती जळते कशी 
शेख तोहीर या विद्यार्थ्याने पाण्यात मेणबत्ती जळते कशी? हा प्रयोग अतिशय रंजक पद्धतीने मांडला आहे. पाण्यात मेणबत्ती जळताना बघितल्यावर नक्कीच आश्चर्य वाटते.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाscienceविज्ञान