नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे ट्रॅव्हल्स, ट्रेन आणि विमान कंपन्यांनीही भाविकांना 'आस्थेच्या यात्रेत' पोहोचविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपुरातून थेट कुंभमेळ्यात अर्थात प्रयागराजला जाण्यासाठी ट्रॅव्हल्स, ट्रेन अन् विमानसेवाही उपलब्ध आहे.
अध्यात्मिक वारसा अन् भारतीय संस्कृतीचे अनोखे पर्व ठरू पाहणारा कुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा भरतो. सोमवारी १३ जानेवारीपासून त्याला प्रयागराजमध्ये प्रारंभ झाला असून, पुढे २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी कोट्यवधी भाविकांची धडपड सुरू आहे. ते ध्यानात घेऊन दळवळण कंपन्यांनीही वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नागपुरातील ट्रॅव्हल्स कंपन्यांनी 'चलो प्रयागराज'ची हाक दिली आहे. मकर संक्रांतीच्या पर्वावर १४ जानेवारीपासून कुंभमेळ्यासाठी खासगी बससेवा उपलब्ध आहे. मंगळवारी एकूण १७ बस प्रयागराजकडे मार्गस्थ होणार आहेत. दुपारी ३ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांहून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्सचे दरही वेगवेगळे आहेत. १५०० रुपयांपासून ३ हजारांपर्यंत एसी, नॉन एसी बसचे तिकीट भाडे आहे.
आज तीन विमानांची भरारी१४ जानेवारीला इंडिगोची तीन विमाने नागपूर ते प्रयागराज अशी भरारी घेणार आहेत. बस आणि रेल्वेच्या तुलनेत अधिक आरामदायक आणि जलद गतीने विमानाचा प्रवास होत असला तरी त्याचे तिकीट दरही महागडे आहे. १४ जानेवारीच्या विमानाचे आज सोमवार दुपारपर्यंत प्रवासभाडे १५ ते १६ हजारांच्या घरात होते. जसजशी मागणी वाढेल तसतसे दरही वाढू शकतात.
नागपूरहून दररोज ७ रेल्वे२२६१३ अयोध्या-रामेश्वरम एक्स्प्रेस१२२९५ संघमित्रा एक्स्प्रेस१२६६९ गंगाकावेरी एक्स्प्रेस२२३५२ पाटलीपुत्र एक्स्प्रेस१२७९१ दानापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस२२६८३ लखनऊ सुपरफास्ट एक्स्प्रेस०६५०९ हमसफर एक्स्प्रेस
तिकीट दरट्रॅव्हल्स : १५०० रुपयांपासून तो ३ हजारांपर्यंतट्रेन : ४८० रुपयांपासून पुढेफ्लाइट : १५ हजारांच्या पुढे
अंतर आणि प्रवास अवधीट्रॅव्हल्स : ६५० किलोमीटर, १२ ते १४ तासांचा प्रवासट्रेन : ९०० किलोमीटर, १४ ते १६ तासफ्लाइट : ५, ७ आणि ९ तास