चिफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर नियुक्तीचा रेकॉर्ड द्या : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:37 PM2019-06-19T23:37:42+5:302019-06-19T23:40:12+5:30

नागपूर फ्लाईंग क्लब येथील चिफ फ्लाईट इन्स्ट्रक्टरचे रिक्त पद भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेचा रेकॉर्ड सादर करण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला व संबंधित प्रकरणावर २८ जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

Let's record the appointment of the Chief Flight Instructor: The order of the High Court | चिफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर नियुक्तीचा रेकॉर्ड द्या : हायकोर्टाचा आदेश

चिफ फ्लाईट इन्स्ट्रक्टर नियुक्तीचा रेकॉर्ड द्या : हायकोर्टाचा आदेश

Next
ठळक मुद्दे नागपूर फ्लाईंग क्लब विकासाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : नागपूर फ्लाईंग क्लब येथील चिफ फ्लाईट इन्स्ट्रक्टरचे रिक्त पद भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेचा रेकॉर्ड सादर करण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला व संबंधित प्रकरणावर २८ जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.
यासंदर्भात सुमेधा घटाटे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चिफ फ्लाईट इन्स्ट्रक्टरपदासाठी २७ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई येथे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मुलाखत समितीमध्ये नागरी उड्डयन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नागरी उड्डयन संचालक व इतरांचा समावेश होता. या समितीने सारासार विचार करून कॅप्टन शिवकुमार जयस्वाल यांची निवड केली होती. राज्य सरकारने जयस्वाल यांच्या नियुक्तीला व जयस्वाल यांनी ठेवलेल्या वेतन प्रस्तावाला मान्यता दिली होती. असे असताना या पदावर जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्याउलट हे पद भरण्यासाठी ४ जून रोजी नवीन जाहिरात प्रसिद्ध करून पात्र व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात आले. त्यावर याचिकाकर्तीचा आक्षेप आहे. जयस्वाल यांची नियुक्ती अंतिम करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.
विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबच्या भल्याकरिता राज्य सरकार आवश्यक निर्णय घेत आहे. परंतु, व्यवस्थापनातील असक्षम अधिकाऱ्यांमुळे क्लबची प्रगती थांबली आहे. व्यवस्थापनामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तेव्हातेव्हा नागपूर फ्लाईंग क्लबने उंच भरारी घेतल्याचा इतिहास आहे. सध्या मात्र क्लबची अवस्था फारशी चांगली नाही असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. श्रीनिवास देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Let's record the appointment of the Chief Flight Instructor: The order of the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.