शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

नागपुरात भाजप-राष्ट्रवादीमध्ये पत्रयुद्ध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 10:58 PM

एरवी विरोधकांचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन निदर्शने करताना दिसतात. मात्र भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क एकमेकांच्या नेत्यांना पत्र पाठवून निषेध दर्शविणे सुरू झाले आहे.

ठळक मुद्देभाजपाने पवारांना जय श्रीरामचे पोस्टकार्ड्स पाठविले राष्ट्रवादीकडून उपराष्ट्रपतींना पत्र पाठवून प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी विरोधकांचा निषेध करण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरुन निदर्शने करताना दिसतात. मात्र भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क एकमेकांच्या नेत्यांना पत्र पाठवून निषेध दर्शविणे सुरू झाले आहे. भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले पोस्टकार्ड पाठविले तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना जय भवानी-जय शिवाजी लिहिलेले पत्र पाठविण्यात आले.

शरद पवार यांनी अयोध्येतील राममंदिराबाबत दिलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे हरिहर मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आले. भाजयुमो, पूर्व नागपूरतर्फे जय श्रीराम लिहिलेले १० हजार पोस्टकार्ड पवार यांना पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५ आॅगस्ट रोजी अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पवार त्याला जाणुनबुजून विरोध करत असल्याचे प्रतिपादन आ. कृष्णा खोपडे यांनी केले. आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, बाल्या बोरकर, मंडळ अध्यक्ष संजय अवचट, प्रमोद पेंडके, महेंद्र राऊत, सचिन करारे, बालू रारोकर, सनी राऊत, चेतना टांक, सरिता कावरे, कांता रारोकर, राजकुमार सेलोकर, मनिषा अतकरे, अभिरुचि राजगिरे, मनिषा धावडे, अनिल गेंडरे, दीपक वाडीभस्मे, जयश्री रारोकर, समिता चकोले, रेखा साकोरे, सेतराम सेलोकर, गुड्डू पांडे, पिंटू पटेल, बंटी शर्मा, जे.पी.शर्मा, रितेश राठे, शुभम पठाडे, आशिष मेहर, मंगेश धार्मिक, गोविंदा काटेकर, हर्षल मलमकर, अतुल कावले, प्रदीप भुजाडे, विकास रहांगडाले, सौरभ भोयर, शंकर विश्वकर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.याशिवाय जीपीओमधूनदेखील भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी पवार यांना पत्र पाठविले. भाजयुमोच्या शहराध्यक्षा शिवानी दाणी वखरे, महामंत्री राहुल खंगार, दिपांशु लिंगायत, रितेश रहाटे, अथर्व त्रिवेदी, पुष्कर पोरशेट्टीवार, सागर गंधर्व, प्रसाद मुजुमदार, संकेत कुकडे, अक्षय ठवकर, रोहित त्रिवेदी, स्वप्नील खडगी प्रामुख्याने उपस्थित होते.दुसरीकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फेदेखील व्यंकय्या नायडू यांना हजारो पत्र पाठविण्यात आले. पत्रांवर जय भवानी-जय शिवाजी लिहिले होते. शहराच्या विविध भागात आंदोलने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, अमोल पालपल्लीवार,अजहर पटेल,तौसिफ शेख, सुफी टाइगर, सरवर अन्सारी, अनिल बोकडे, शुभम टेकाडे, शहबाज शेख, कमलेश बांगडे, अमित श्रीवास्तव प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस