शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

नागपूर जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचा स्तर धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:30 AM

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने २०१७-१८च्या अहवालात मान्सूननंतर रासायनिक मोहिमेचा अहवाल सादर केला आहे. यात नागपूर जिल्ह्याचा १३ तालुक्यातील ८५९२ पाण्याचे नमुने तपासले असता ५५०४ म्हणजे ६४ टक्के नमुने दूषित आढळले आहेत, तर ४५४९ नमुन्यामध्ये नायट्रेटची मात्रा जास्त आढळून आली आहे.

ठळक मुद्दे५५०४ नमुने दूषित ग्रामीणांचे आरोग्य धोक्यात

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने २०१७-१८च्या अहवालात मान्सूननंतर रासायनिक मोहिमेचा अहवाल सादर केला आहे. यात नागपूर जिल्ह्याचा १३ तालुक्यातील ८५९२ पाण्याचे नमुने तपासले असता ५५०४ म्हणजे ६४ टक्के नमुने दूषित आढळले आहेत, तर ४५४९ नमुन्यामध्ये नायट्रेटची मात्रा जास्त आढळून आली आहे. याची टक्केवारी ५३ टक्के एवढी आहे. दूषित पाण्यामुळे ग्रामीण लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, वायू मिसळलेले असतात. पाण्यात हे सर्व पदार्थ अतिप्रमाणात एकत्र मिसळले गेल्यास पाणी प्रदूषित होते आणि ते आरोग्यास हानीकारक असते. खेड्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर खेड्यांमध्ये आजही ७० टक्के लोक दूषित पाणी पितात. त्यामुळेच ग्रामीण क्षेत्रात पाण्यामुळे होणारे आजारांचे प्रमाणही अधिक आहे. म्हणूनच मान्सूनपूर्व व मान्सूननंतर पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले जातात. नागपूर जिल्ह्यात नमुने तपासण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची आहे. या विभागाने नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, हिंगणा, कुही, काटोल, नागपूर ग्रामीण, नरखेड, पारशिवनी, रामटेक, सावनेर, उमरेड, मौदा, कामठी, कळमेश्वर या १३ तालुक्यामधील एकूण ८५९२ पाण्याचे नमुने तपासले. यात ४५४९ पाण्याच्या नमुन्यांमध्ये नायट्रेट आढळून आले. ७८९ नमुन्यांमध्ये फ्लोराईड, २२४ नमुन्यांमध्ये आयर्न, ४४० नमुन्यांमध्ये ‘टीडीएस’, १३५ नमुन्यांमध्ये आम्लता, २४ नमुन्यामध्ये क्लोराईड तर ११० नमुन्यामध्ये सल्फेट आढळून आले आहे. असे असताना, हे नेहमीचे आहे, असे म्हणून जिल्हा परिषद याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे.नायट्रेटमुळे कॅन्सरचा धोकातज्ज्ञानुसार, पाण्यात जर दहा मिलिपेक्षा अधिक नायट्रेट असल्यास तर लहान मुलांना ‘मिथॅमोग्लोबिनेमिआ’ हा आजार होतो. शरीर निळे पडते, आॅक्सिजन कमी होतो, त्यामुळे रुग्ण मुलाला कृत्रिम आॅक्सिजन लावावा लागतो तर मोठ्या माणसांना रक्तदाब, पोटदुखी, पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढण्यामागे कीटकनाशकांचा वाढता वापर हेही एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.७८९ पाण्याच्या नमुन्यात फ्लोराईडप्रदूषित आढळून आलेल्या ५५०४ नमुन्यांमधील ७८९ नमुन्यांमध्ये फ्लोराईड आढळून आले आहे. याची टक्केवारी ११५.३ टक्के एवढी आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे हाडे व दात ठिसूळ होतात. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते. पोटाचा विकार, लिव्हर, किडनी, हृदय कोशिकेवर परिणाम होतो.

नागपूर ग्रामीण भागातील ६४ टक्के पाण्याचे नमुने प्रदूषित आले तरी ८५ टक्के लोकांना पाईप लाईनमधून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. ज्या स्रोतामधून पाण्याचे नमुने दूषित येतात, तिथे पिण्यायोग्य पाणी नसल्याचे फलक किंवा लाल रंग लावला जातो.-विजय टाकळीकर,कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद.

४५४९ नमुन्यांत नायट्रेटअहवालानुसार इतर तालुक्याच्या तुलनेत मौदामधील सर्वाधिक, ५८८ पाण्याच्या नमुन्यामध्ये नायट्रेट आढळून आले आहे. शिवाय, भिवापूरमध्ये ३३८, हिंगण्यामध्ये ४६७, कुहीमध्ये ४३७, काटोलमध्ये ११९, नागपूर ग्रामीणमध्ये ४२१, नरखेडमध्ये १०१, पारशिवनीमध्ये २२२, रामटेकमध्ये ६५१, सावनेरमध्ये ३७२, उमरेडमध्ये २६९, कामठीमध्ये २६२ तर कळमेश्वरमध्ये ३०२ असे एकूण ४५४९ नमुन्यामध्ये नायट्रेट आढळून आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य