शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आता 'ते' समाजाचे घटक आणि देशाचे नागरिक आहेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 7:13 AM

Nagpur news LGBT तृतीयपंथी, गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल व इतर या वर्गात मोडणाऱ्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या सारथी ट्रस्ट व समाजकल्याण विभागाच्या वतीने सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले .

ठळक मुद्देतृतीयपंथियांसह एलजीबीटी ग्रूपसाठी आधार, पॅन व रेशनकार्ड शिबिराचे विदर्भातील पहिले आयोजन अशा प्रकारचे शिबिर हे विदर्भातील पहिले आयोजन होते

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: स्वत:चे नाव, पत्ता, वय, कुटुंबाची माहिती नोंदवलेला कागद हाती घेऊन बाहेर पडणाºया 'त्यांच्या' चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता. हाती फार मोठी संपत्ती गवसल्याची ती जाण होती.. आपण खºया अर्थाने आता नागरिक झालो आहोत याची ती सार्थता होती... आणि आता पुढचे आयुष्य अधिक सन्मानाने जगण्याचा मार्ग खुला झाला याचा तो विश्वास होता... .. हे निमित्त होते, एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्ती व एलजीबीटी ग्रूपसाठी आयोजित केलेल्या महासामाजिक भागीदारी शिबिराचे. ज्यात आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, संजयगांधी निराधार योजना, तृतीयपंथी ओळखपत्र बनवणे व कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्यात आला होता. अशा प्रकारचे शिबिर हे विदर्भात प्रथमच घेण्यात आले होते. तृतीयपंथी, गे, लेस्बियन, बायोसेक्शुअल व इतर या वर्गात मोडणाऱ्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या सारथी ट्रस्ट व समाजकल्याण विभागाच्या वतीने सीताबर्डी येथील लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले .सहाय्यक आयुक्त रविंद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात आतापर्यंत ३०० हून अधिक तृतीयपंथी व अन्य सदस्यांनी आपली आवश्यक असणारी ओळखपत्रे बनवली. जिथे प्रत्येक पावलावर व्यक्तीला आपली ओळख सिद्ध करावी लागते अशा या काळात या समुदायाकडे स्वत:ची कोणतीच अधिकृत ओळख पटवायला कोणताही शासकीय दस्तावेज नव्हता. कोरोनाकाळात लसीकरण करायचे झाले तरी आधारकार्डाची गरज पडत होती. या समुदायाची ही महत्त्वाची गरज लक्षात घेता, सारथी ट्रस्ट व समाजकल्याण विभागाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  या शिबिराची माहिती तृतीयपंथियांना मिळावी या हेतूने शहरातील तृतीयपंथियांच्या पाच घराण्यांमध्ये त्याची सूचना देण्यात आली असल्याची माहिती विद्या कांबळे यांनी दिली. शिबिरात सहभागी झालेले शासकीय अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्यासाठीही हा एक अनोखा अनुभव ठरला. 

आधारकार्ड  बनविण्यासाठी आईवडिलांचे नाव लागते. तृतीयपंथीय हे त्यांच्या घराण्यांवरून ओळखले जातात. शिबिरात त्या अर्जावर आईवडिलांच्या नावाऐवजी या घराण्यांची नावे लिहिण्यात आली अशी माहिती याठिकाणी असलेले अधिकारी अश्फाक बेग यांनी दिली. 

पत्ता नीट नसणे, अन्य कागदपत्रे नसणे या बाबींमुळे आधार व पॅनकार्डसारख्या गोष्टी बनवायला अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी येथे विशेषत्वाने अ‍ॅड्रेस प्रूफ सर्टिफिकेशनची सोय करण्यात आली होती. त्यासाठी नायब तहसीलदार तेथे नियुक्त करण्यात येऊन संबंधित प्रमाणपत्र तात्काळ दिले जात होते. 

तृतीयपंथीय व समलैंगिक व्यक्तींचे प्रतिनिधीत्व सरकारदरबारी असण्याची गरज येथे व्यक्त करण्यात आली. त्याकरिता लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यासाठी एक जागा राखीव असावी अशी मागणी काही जणांनी व्यक्त केली.

शिबिरात निकुंज जोशी, विद्या कांबळे, आनंद चांदरानी, आंचल शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :LGBTएलजीबीटी