मोफत भेटवस्तू योजना : भारतात २० व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष सवलत नागपूर : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक किम की वान यांनी नागपुरात गुंतवणुकीच्या अनेक शक्यता असल्याचे सांगितले. नागपूर हे भारतातील झपाट्याने प्रगती होणारे शहर आहे. नुकताच त्यांनी मुंबई येथे झालेल्या भेटीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीला नागपुरात गुंतवणूक करण्याची सल्ला दिला. हा सल्ला सकारात्मक रूपाने घेऊन एलजी ग्रुप विचारविनिमय करून नागपुरात निश्चित गुंतवणूक करणार आहे. सोबतच नागपुरात कंपनी आपला मार्केट शेअर आणि सीएसआरच्या हालचाली वाढविणार आहे. या दिशेने नागपूर दौऱ्यावर आलेले किम की वान आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी कंपनीचे सेल्स डायरेक्टर संजीव अग्रवाल, प्रादेशिक व्यापार प्रमुख रोहित केशकामत, प्रादेशिक व्यवस्थापक एस. मोहंती उपस्थित होते. वान म्हणाले, एलजी (लाईफ्स गुड) इलेक्ट्रॉनिक्स नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज कंपनीने भारतात आपली २० वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्त ग्राहकांना एलजीच्या विश्वस्तरीय उत्पादनांवर विविध प्रकारचे आकर्षक आणि विशेष आॅफर देण्यात येतील. यानुसार २० हजाराची कॅशबॅक आॅफर, २० महिन्यांच्या ईएमआय प्रोग्राम, निवडक उत्पादनांसाठी एमआरपीवर २० टक्के सुट, अनेक उत्पादनांवर मोफत भेटवस्तु देण्यात येतील. या शिवाय ग्राहकांसाठी एक आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात येईल. एलजीशी संबंधित आपले अनुभव ग्राहक कंपनीच्या वेबसाईटवर व्यक्त करू शकतात. ग्राहक आपले म्हणणे ब्रँण्डच्या फेसबुक पेजवर अपलोड करू शकतात. निवडक प्रतिक्रियांना साप्ताहिक पुरस्कार जिंकण्याची संधी मिळेल. तर अंतिम विजेत्यास मेगा पुरस्काराच्या रुपाने एलजी ब्रँण्डच्या टीव्ही कमर्शियल फिल्ममध्ये पाहण्याची संधी मिळेल. कंपनीकडून आगामी २० वर्षाचे व्हिजन तयार केले जाणार आहे. भारतात ७० हजार कोटी रुपयांच्या कन्झुमर ड्युरेबर मार्केटमध्ये एलजीचा मार्केट शेअर ३३ टक्के आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स भारतात ग्रेटर नोएडा, पुण्याच्या रांजणगावमध्ये जागतिकस्तरीय आणि अत्याधुनिक निर्मिती करणारी कंपनी आहे. येथे एलईडी टीव्ही, एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर आणि मॉनिटरचे उत्पादन करण्यात येते. (वा. प्र.)
एलजीची नागपुरात गुंतवणुकीची इच्छा
By admin | Published: April 28, 2017 3:01 AM