वाचनालये उघडणार
जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये व वाचनालये ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, परंतु स्पर्धा परीक्षा जवळ आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून वाचनालये उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले, तसेच नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करीत रविवारीही नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
बॉक्स
सामूहिक इच्छाशक्तीचे दर्शन नागपूर महानगरासोबतच नागपूर परिसर व ग्रामीण भागातही शनिवार व रविवार नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी नागरिकांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरीच राहत या आवाहनाला प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद म्हणजे सामूहिक इच्छाशक्तीचे दर्शन आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात छोट्या व्यावसायिकांनी यामध्ये घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. विविध व्यापारी संघटनांनी या काळात प्रशासनाला मोलाची साथी दिली. सामान्य नागरिकाला आपल्या आरोग्याची किंमत कळायला लागली असून, या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्व जण मिळून लढणे गरजेचे आहे. नागरिकांनी उद्याही घराबाहेर पडू नये.
रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी