फोटो आहे... वाणिज्य पट्टा ... ८ बाय २ ...
नागपूर : या कोरोना साथीच्या काळात सर्व जण स्वत:ला संसर्गापासून वाचवण्यासाठी खबरदारी घेत आहेत. वेळोवेळी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तथापि, मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे जाऊन अनेक लोकांद्वारे काळजी घेण्याचे मानवी प्रयत्न केले जात आहेत. त्याचे एक उदाहरण अमरावती रोडवरील लाइफस्टाल टाऊनशिपच्या बिल्डरांसमवेत पाहायला मिळते. के. के. असोसिएट्स ही मध्यभारतातील प्रीमियम डेव्हलपर उरीच इंडिया प्रा.लि.ची उपकंपनी असून दर्जेदार घरे आणि चांगल्या नियोजित टाऊनशिपसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या भागीदारामार्फत सौरभ टावरी यांच्यासह अॅड. नीलेश राठी आणि शिखा टावरी यांनी यांनी लाफस्टाइल अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनला ऑक्सिजन कॉन्सेनट्रेशन मशीन भेट दिली. गेल्या वर्षीही अपार्टमेंट ओनर्ससाठी एन-९५ मास्क पाठविले होते. ही मशीन ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्यांची रिकव्हरी अथवा रुग्णालयात जाण्यापूर्वी स्टँडबाय मदत करते. या महामारीच्या काळात असोसिएशन चांगल्या एसओपीचा पाठपुरावा करीत असल्याचे मत सौरभ टावरी यांनी व्यक्त केले. या सोहळ्यास सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मानकर आणि सचिव कौशिक यांच्यासमवेत श्री. तंटूवय उपस्थित होते. डॉ. मानकर यांनी स्वत: आणि असोसिएशनच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. लाइफस्टाइल टाऊनशिपमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. यामध्ये स्विमिंग पूल, एअर-कॉन जिम, मोठा हॉल, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, मंदिर आणि बरेच काही आहे. लाइफस्टाइल ही प्रीमियम २२४ अपार्टमेंटची टाऊनशिप असून त्यात व्यावसायिक जागा आहे. (वा.प्र.)