जलालखेडा : स्थानिक एस. आर. के. इंडो पब्लिक स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात विद्यार्थ्यांनी दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिराेशिमा व नागासाकी या शहरांची अणुबाॅम्ब हल्ल्याच्या विदारकतेची चित्रे रेखाटून आठवणींना उजाळा दिला.
अमेरिकेने हा हल्ला ६ व ९ ऑगस्ट १९४५ राेजी केला हाेता. यात दाेन लाखांपेक्षा अधिक जपानी नागरिकांचा मृत्यू झाला हाेता. या घटनेची आठवण म्हणून ६ ऑगस्ट हा दिवस हिरोशिमा - नागासाकी दिवस म्हणून पाळला जातो. विद्यार्थ्यांना जागतिक इतिहासाची माहिती व्हावी म्हणून शाळेच्या वतीने यावर चित्रकला स्पर्धा आयाेजित केली हाेती. या स्पर्धेत इयत्ता सातवी व आठवीतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले हाेते. ज्ञानेश्वरी कन्हेरे, संजना जयस्वाल, मृणाल मानमोडे, हर्षदा डवरे, हर्षणी डांगर, लावण्या रुद्रकर, हितेश लाड, प्रज्वल जीवनकर, मयंक वानखेडे, प्रज्वल वानखेडे, सर्वेश नंदनवार, अवणी हिवरकर, आर्या तानोडकर या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख पोस्टर तयार केले.