कन्हान जलशुध्दीकरण केंद्राच्या इनटेक वेलमध्ये कचरा अडकला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कन्हान नदीला पूर आला आहे. यामुळे जलशुध्दीकरण केंद्राच्या इनटेक वेलमध्ये कचरा अडकला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत कचरा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु त्यानंतरही काही दिवस शहरातील नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज व आसीनगर झोन भागातील वस्त्यांना मर्यादित व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
नदीला पूर आल्याने पाण्यासोबत कचरा व माती वाहून येत असल्याने इनटेक वेल व कन्हान जलशुध्दीकरण केंद्रात चोकेज निर्माण होत आहे. कचरा अडकला असल्याने पूर्ण क्षमतेने कच्चे पाणी उचलून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहचवण्यात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. कन्हान जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता २४० एमएलडी आहे. पूर्ण क्षमतेने पाणी पोहचवण्यासाठी ५ पंप जवळपास १८ ते १९ तास सुरू ठेवणे आवश्यक आहे.परंतु पुरामुळे यात बाधा येत आहे.
...
प्रभावित झोन व जलकुंभ
आसीनगर झोन : बिनाकी १,२,३, इंदोरा १,२ जलकुंभ, बेझनबाग जलकुंभ.
सतरंजीपुरा झोन : बस्तरवाडी १,२ ए, २ बी, शांतीनगर जलकुंभ, वांजरी जलकुंभ.
लकडगंज झोन : लकडगंज १,२ कळमना, मिनीमाता नगर, सुभाननगर, भारतवाडा, पारडी १,२, भांडेवाडी जलकुंभ.
नेहरूनगर झोन : सक्करदरा १,२,३, नंदनवन एक्सटेंशन,१,२, खरबी, दिघोरी जलकुंभ.