लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : पाेलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत सट्टापट्टी अड्ड्यावर धाडी टाकल्या. यात १३ जणांविरुद्ध गुन्हे नाेंदविण्यात आले असून, त्यांच्याकडून एकूण ३४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कळमेश्वर पाेलिसांनी त्यांच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याची विशेष माेहीम हाती घेतली आहे. या माेहिमेंतर्गत पाेलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सट्टापट्टी अड्ड्यांवर धाडी टाकल्या. यात साेमेश्वर शलिकराम राऊत (वय ४२, रा. कळमेश्वर), दिलीप काशीनाथ पाटील (५०, रा. उबाळी, ता. कळमेश्वर), रवींद्र बाबूराव बांधेकर (५२, रा. ब्राह्मणी, ता. कळमेश्वर), इमरान ऊर्फ कल्लू अल्ताफ शेख (३४, रा. कळमेश्वर), माेहम्मद कैश मुन्शी अन्सारी (४१, रा. १४ मैल), राकेश पुरुषाेत्तम लाखे (३१, रा. घाेराड, ता. कळमेश्वर), लक्ष्मण पतंगी ठाकूर (३५, रा. घाेराड, ता. कळमेश्वर), महादेव आनंदराव गाडगे (४८, रा. कळमेश्वर), मनाेज गुलाबराव राेडे (३३, रा. आठवा मैल), ओमप्रकाश प्रभाकर काेडवते (३३, रा. ब्राह्मणी, ता. कळमेश्वर), विकास सुखदेव वानखेडे (३३, रा. आठवा मैल), अविनाश मंगल गजभिये (३७, रा. आठवा मैल) व संदीप गणपत बावणे (३४, रा. गाेंडखैरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला.
त्यांच्याकडून राेख रक्कम व सट्टापट्टीचे साहित्य असा एकूण ३४ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक मनाेज खडसे, उपनिरीक्षक शरद गायकवाड, मन्नान नाैरंगाबादे यांच्या पथकाने केली. ही माेहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले.