शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

कृषी विभागात ‘लिक्वीड’ लोचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2016 2:45 AM

सध्या नागपूर कृषी विभागात जैविक निविष्ठांचा ‘लिक्वीड’ लोचा चांगलाच गाजत आहे.

जैविक निविष्ठा प्रकरण : कृषी विद्यापीठाच्या शिफारशी डावलून कोट्यवधींची खरेदीजीवन रामावत नागपूर सध्या नागपूर कृषी विभागात जैविक निविष्ठांचा ‘लिक्वीड’ लोचा चांगलाच गाजत आहे. मागील दोन वर्षांपासून कृषी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशी धुडकावून प्रात्यक्षिकांच्या नावाखाली कोट्यवधीच्या द्रव (लिक्वीड) स्वरूपातील जैविक निविष्ठांची (रायझोबियम, क्विनॉलफॉस, मेटॅरायझियम, पीएसबी) खरेदी केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.विशेष म्हणजे, कृषीतज्ज्ञांच्या मते, कृषी विद्यापीठाने अजूनपर्यंत या द्रवस्वरूपातील जैविक निविष्ठा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळेच मागील २०१४-१५ पर्यंत पावडर स्वरुपातील जैविक निविष्ठा शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या. जाणकारांच्या मते, त्या पावडर स्वरूपातील निविष्ठा स्वस्त होत्या, शिवाय अधिक परिणामकारकसुद्धा होत्या. मात्र असे असताना कृषी विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ या निविष्ठा पुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांचा खिसा भरण्यासाठी या द्रव स्वरूपातील जैविक निविष्ठांचा नवा शोध लावला आणि तो सर्वांवर थोपविला. यावर्षी २ जून २०१६ रोजी कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) के. व्ही. देशमुख यांनी त्या निविष्ठा वाटपासंबंधी गाईडलाईनसुद्धा जारी केली. मात्र नागपूर कृषी विभागाने त्याही पेक्षा एक पाऊल पुढे टाकत मागील वर्षीपासूनच जिल्ह्यात या द्रव स्वरूपातील निविष्ठांची खरेदी सुरू केली आहे. मात्र आज तीच खरेदी कृषी विभागाच्या अंगलट आली आहे. कृषी विद्यापीठाने या द्रव स्वरूपातील निविष्ठांना मान्यता दिली नसल्याने कृषी विद्यावेत्ता डॉ. नागदेवते यांनी सुद्धा मागील वर्षीपासून कृषी विभागाच्या ‘प्रात्यक्षिक किट’वर स्वाक्षरी केलेली नाही. नियमानुसार कृषी विद्यावेत्त्याच्या ‘किट’ वरील स्वाक्षरीशिवाय कोणतीही खरेदी करता येत नाही. मात्र असे असताना नागपूर कृषी विभागाने मागील दोन वर्षांत ठराविक पाच कंपन्यांकडून सर्रास कोट्यवधीची खरेदी केली आहे. एवढेच नव्हे तर यंदासुद्धा सुमारे १ कोटी ६० लाखांपेक्षा अधिकचे आॅर्डर त्याच कंपन्यांना जारी केले आहेत. ‘लोकमत’ ने मागील पाच दिवसांपूर्वी ‘कृषी विभागात निविष्ठांचा गोलमाल’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून, या सर्व प्रकरणाचा भंडाफोड करताच संपूर्ण कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. शिवाय कृषी विद्यावेत्ता डॉ. नागदेवते यांच्यावर स्वाक्षरीसाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे मागील चार दिवसांपर्यंत कृषी विभागाच्या ‘प्रात्यक्षिक किट’वर स्वाक्षरी केली नसल्याचे स्वत:च सांगणारे डॉ. नागदेवते आता मात्र अचानक स्वत: हून स्वाक्षरी करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांच्या मागे फिरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मागील चार दिवसात असे काय घडले, हा सध्या कृषी विभागात चर्चेचा विषय ठरला आहे. नागपूर कृषी विभागातील या ‘लिक्वीड’ लोच्यावर कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) के. व्ही. देशमुख यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना द्रव स्वरूपातील जैविक निविष्ठासंबंधी काहीही तक्रारी असल्यास त्या आयुक्तालयाला लेखी स्वरूपात कळवाव्या, असे ते म्हणाले.