लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात दारुबंदी करावी यासह इतर मागण्यांसाठी बेरोजगार युवा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.बेरोजगार युवा बहुउद्देशीय संस्थेने नागपूर जिल्ह्यात दारुबंदी करावी या प्रमुख मागणीसाठी विधानभवनावर मोर्चा काढला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी नागरिकांनी जोरदार नारेबाजी करून आपल्या मागण्या रेटून धरल्या. सुरेश घोडमारे, सुधीर धुरिया, सुरेश घोडमारे, संदीप मेश्राम, पौर्णिमा भिलावे यांच्या शिष्टमंडळाने उत्पादन शुल्क मंत्री छगन भुजबळ यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्रिमहोदयांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर निवेदनातील मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.नेतृत्व : सुरेश घोडमारे, सुधीर धुरिया, संदीप मेश्राम, पौर्णिमा भिलावमागण्या :१) नागपूर जिल्ह्यात दारुबंदी करावी२) अत्याचार झालेली आदिवासी महिला चंद्रकला बाजीराव यांना न्याय द्यावा३) बेरोजगारांना नोकऱ्या, रोजगार उपलब्ध करून द्यावा४) स्थानिक लोकांना कामावर घेऊन स्थायी करावे५) कोराडी पॉवर प्लँटमध्ये ८० टक्के आरक्षणानुसार स्थानिकांना रोजगार द्यावा
नागपूर जिल्ह्यात दारुबंदी करा : बेरोजगार युवा बहुउद्देशीय संस्थेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 1:06 AM